*माजी मंत्री ढोबळे यांच्या मागणीची शासनाकडून दाखल* *आण्णाभाऊ साठे यांच्या द्देजयंती उत्सव मिरवणुकीसाठी मिळाला वेळ वाढवून *अनुयायांमधून बहुजन रयत परिषदेचे कौतुक अन् सरकारचेही मानले आभार*

पंढरपूर/प्रतिनीधी
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध भागातून तब्बल महिनाभर उत्सव साजरा करण्यात येतो. यामध्ये गावातील आणि शहरातील मिरवणुका हा त्यातील महत्वाचे अंग असते. यामध्ये सरकारने ठरवून दिलेली वेळ अपुरी असते. त्यासाठी ही वेळ वाढवून मिळावी अशी मागणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि कोमलताई ढोबळे यांनी सरकारकडे केली होती. याबाबत सरकारने सकारात्मक विचार करून ही वेळ वाढवून देत रात्री 12पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे अनुयायांमधून बहुजन रयत परिषदेचे कौतुक अन् सरकारचेही आभार मानले जात आहे.
याबाबत बहुजन रयत परिषदेचे संस्थापक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कोमलताई ढोबळे यांनी 28जुलै रोजी आपल्या शिष्टमंडळासह राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले होते.
हा जयंती उत्सव 1ऑगस्ट पासून 31ऑगस्ट पर्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत असतो . त्यामुळे तब्बल महिनाभर हा जयंती उत्सव आंनदाने साजरा करण्यासाठी वेळ वाढवून मागितली होती. याचा सरकारने सकारात्मक विचार करून गृह विभागाचे उप सचिव मनोज जाधव यांच्यामार्फत राज्याचे पोलिस महासंचालक यांना परिपत्रक सादर केले आहे.त्यामुळे सर्व राज्यातील पोलीस स्टेशन यांनीही वरील पद्धतीने वाढविण्यात आलेल्या वेळेची माहिती देणं आली आहे.यामुळे यंदाची साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती घाईगडबडीत न होता मनमोकळी पणाने साजरी करण्यात येणार आहे.