*प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी घेतली शरद पवार यांची दिल्लीत भेट* *गादेगाव येथील हायस्कूलच्या ईमारत निधीसह इतर अनेक महत्वाच्या विषयावर झाली सकारात्मक चर्चा*

पंढरपूर/प्रतिनीधी
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी खा. शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. सदरची भेट शुक्रवारी सकाळी ९वाजता जनपथ ६या पवार यांच्या निवासस्थानी झाली असून महत्वाच्या बाबीवर सकारात्मक चर्चा झाली असल्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सांगितले.
दिल्ली येथील या बैठकीमध्ये सध्या राज्यामध्ये उद्योग व व्यापार विभागाचे काम अत्यंत समाधानकारक असून, असेच संघटन राष्ट्रीय स्थरावरही मोठ्या प्रमाणात करण्याबाबत बैठकीअंती चर्चा झाली.
पंढरपूर तालुक्यातील फाटे यांचे मुळगाव असलेल्या गादेगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नावाचे हायस्कूल आहे. या हायस्कूलचे ईमारत बांधकाम मागील अनेक दिवसापासून सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामचे भूमिपूजन खा. शरद पवार यांनी केले होते. त्या नंतर ग्रामस्थांनी दिलेल्या लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणावर काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित कामासाठी आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या वतीने निधी मिळावा. यासाठी फाटे यांनी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. यावर पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शाळा इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. या भेटीप्रसंगी खा. शरद पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी युवा उद्योजक सचिन धुमाळ, दिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथील उद्यान विभागाचे बाळासाहेब बुळे यांच्यासह राष्ट्रवादी उद्योग व व्यापारी विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.