*करकंब कागदपत्रे फसवणूक प्रकरणातील आरोपी  समाधान गुंड यास न्यायालयाने जामीन नाकारला* *14 दिवसांची  कोठडी*

*करकंब कागदपत्रे फसवणूक प्रकरणातील आरोपी  समाधान गुंड यास न्यायालयाने जामीन नाकारला*  *14 दिवसांची  कोठडी*

करकंब :प्रतिनिधी

करकंब येथील किराणा दुकानदारास बोगस परवाना दिल्याबद्दल गुन्हा दाखल असलेला आरोपी समाधान गुंड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून त्यास 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली  असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 याबाबत माहिती अशी की,करकंब येथील किराणा दुकानदारास बोगस परवाना दिल्याने अटकेत असलेल्या समाधान गुंड यास तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती त्याची मुदत आज संपल्यानंतर आज न्यायालया पुढे उभे केले असता त्यास 14  दिवसांची न्यायालयिन कोठडी देण्यात आली. 
    न्यायलयिन कोठडी दिल्यानंतर गुंड याचे वतीने जामीन मिळण्यासाठी अर्ज देण्यात आला होता परंतू गुन्ह्यांचे स्वरुप गंभीर असल्याने न्यायालयाने जामीन फेटाळला असून समाधान  गुंड यास आणखी 14 दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत.