*करकंब येथे क्रांतीसुर्य- महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त इंद्रजीत देशमुख यांच्या व्याख्यानमालेच्या आयोजन.....!* *विविध सामाजिक व विधायक उपक्रमाचे आयोजन.*

करकंब/ प्रतिनिधी:-
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त करकंब शहरात प्रथमच "महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या"वतीने मंगळवार दिनांक: ११ एप्रिल,२०२३ रोजी सकाळी बसस्टँडवर ९.३०वा.महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून त्यानंतर वृक्षारोपण व विद्यार्थोंना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यानंतर सायंकाळी ६:०० वा.बसस्टॅड करकंब येथे सर्व महाराष्ट्राला आपल्या वाणीने वेड लावणारे व्यक्तिमत्त्व IAS अधिकारी श्री.इंद्रजित देशमुख यांचे महात्मा जोतीराव फुले आणि सामाजिक कार्य व सध्याची पिढी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून करकंब व करकंब पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा जोतीराव फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.कार्यक्रम वेळेवरच सुरु होणार असून महिलांसाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व करकंब नगरीतील फुले प्रेमी करकंबकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.