*इसबावी प्रभाग क्र.12 मधिल रस्त्यांसाठी 1 कोटी 50 लाख रू.निधी मंजूर*

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या इसबावी उपनगर भागातील प्रभाग क्र. बारा मधिल प्रमुख रस्ते गेल्या काही दिवसांपासुन खराब झाले आहेत त्यामुळे नागरीकांना ये-जा करत असताना या खराब रस्त्यांमुळे नाहक ञासास सामोर जावे लागत आहे त्यामुळे येथिल स्थानिक नागरिकांनी या प्रभागाचे नगरसेवक पंढरपूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विशाल मलपे व नगरसेविका भाग्यश्री शिंदे यांच्याकडे या रस्त्यांचे काम व्हावे अशी मागणी केली होती.
त्या मागणीची दखल घेत नगरसेवक मलपे व भाग्यश्री शिंदे यांनी पंढरपूर न.पाच्या मिटिंग मध्ये प्रभाग क्र.बारा मधिल रस्त्यांच्या कामाकरिता नगरपरिषद नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांच्याकडे सोलापूर जिल्हा विधानपरिषदेचे आ.प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली निधीची मागणी केली होती त्यास पंढरपूर न.पा मिटिंग मध्ये येथिल रस्त्यांच्या कामासाठी 1 कोटी 50 लाख रूपयांची मंजूरी मिळाली असून प्रभागातील रस्त्यांची कामे पूर्ण करू अशी माहिती नगरसेवक विशाल मलपे व भाग्यश्री शिंदे यांनी दिली.