*करकंब येथील वीरभद्र यात्रेस  आजपासून सुरुवात.....!* *धाकटी वेस येथे विविध धार्मिक,सांस्कृतिक, लोकनाट्य व जंगी कुस्त्यांचे मैदान.*

*करकंब येथील वीरभद्र यात्रेस  आजपासून सुरुवात.....!*  *धाकटी वेस येथे विविध धार्मिक,सांस्कृतिक, लोकनाट्य व जंगी कुस्त्यांचे मैदान.*

करकंब /प्रतिनिधी. :

- धाकटी वेस करकंब (बनगर) येथील श्री विरभद्र देवस्थान ची यात्रा  आज सोमवार दिनांक-६ मार्च रोजी पासून सुरू यात्रा होत असून यामध्ये विविध धार्मिक मनोरंजन सांस्कृतिक तसेच जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे  आयोजन करण्यात आले आहे.
      या श्री विरभद्र यात्रा महोत्सवामध्ये सोमवारी श्री वीरभद्र मंदिर (बनगर गल्ली) करकंब येथे अभिषेक व विविध धार्मिक कार्यक्रम पूजा-अर्चा संपन्न करून या यात्रेस सुरुवात होणार असून संध्याकाळी सात वाजता-श्री.वीरभद्र यांची महारती करून पालखीतून करकंब नगरीतून गाव प्रदक्षिणा करून छबीना काढण्यात येणार आहे. 
       सोमवार दिनांक-६ सहा रोजी वनिता लोकनाट्य तमाशा चे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे तसेच मंगळवार दिनांक-७ रोजी धाकटी वेस येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन करण्यात आले असून या जंगी कुस्त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून नामवंत पैलवान हजेरी लावणार आहेत.
    त्याचबरोबर बुधवार दिनांक-८ रोजी संध्याकाळी सात ते नऊ वीरभद्र मंदिर बनगर गल्ली येथे सूश्राव्य असे नारदीय कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यात्रा महोत्सवास करकंब व करकंब परिसरातील भाविकांनी ग्रामस्थांनी लाभ घ्यावा .असे देवस्थानचे ट्रस्टी व पंच कमिटी यांनी आवाहन केले आहे. या यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने या परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली असून विद्युत रोषनाई मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्टी, व पंच कमिटी विशेष परिश्रम घेत आहेत.