*मानसी फाटे हीचे एमबीबीएस परिक्षेत यश* राष्ट्रवादीचे नेते नागेशदादा फाटे यांची आहे कन्या*

बोहाळी/ : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभाग प्रदेश अध्यक्ष नागेश दादा फाटे यांची कन्या मानसी नागेश फाटे हिने एमबीबीएस परिक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. एमबीबीएस परिक्षेत यश संपादन केल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मानसी फाटे हिचे पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण मातृमंदिर पंढरपूर ( राजाराम इंग्लिश स्कूल पंढरपूर) येथे येथे झाले. तर माध्यमिकचे पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव येथे झाले. अकरावी व बारावीचे शिक्षण यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारा येथे पूर्ण केले. तर उच्च शिक्षणासाठी भारती विद्यापीठ सांगली येथे प्रवेश घेतला. अत्यंत मेहनतीने एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण करीत एमबीबीस पदवी प्राप्त केली आहे. याबद्दल गादेगाव पंचक्रोशी तसेच पंढरपूर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून मानसी चे अभिनंदन केले जात आहे.
मानसीला प्रा. हनुमंत फाटे, प्रा.किरकत, न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र रेपाळ, प्रा.कांबळे, राजाराम कॉलेजच्या श्रीमती भोसले आदींचे मार्गदर्शन लाभले. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने नागेश दादा फाटे यांनी तिला तिच्या इच्छेनुसार एमबीबीस करण्यास चालना दिली. मानसी ने देखील श्रीमंत कुटुंबातून पुढे येत डॉक्टरकीची पदवी घेत माता पित्याची मान अभिमानाने उंचावली आहे. याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
.............................................................................................