*सहकार रत्न कै. कृष्णात भाऊ पूरवत प्रतिष्ठान व अभिषेक भैया पूरवत मित्र मंडळ यांच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप.* *स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे केले आयोजन.

करकंब /प्रतिनिधी

:-सहकार रत्न कै. कृष्णात भाऊ पूरवत प्रतिष्ठान आणि युवा नेते अभिषेक भैया पुरवत मित्र मंडळाच्या वतीने करकंब येथील
 जि. प. प्राथ. शाळा मुले क्र.२ करकंब येथे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव याचे औचित्य साधून सहकार रत्न कै. कृष्णात (भाऊ)रामचंद्र पुरवत  प्रतिष्ठान आणि करकंब गावचे लोकप्रिय युवक नेते अभिषेक भैय्या पुरवत आणि मित्रमंडळ यांच्या वतीने शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या प्रत्येकी चार *आर्थिक दुर्बल* विद्यार्थ्यांना मोफत गणवेष वाटप करण्यात आले.
      तसेच *हर घर तिरंगा* या उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांना ध्वज वितरित करण्यात आला.
       तसेच शाळेस लागणाऱ्या इतर बाबींची पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.शाळेची शिस्त,वातावरण आणि ११३ इतकी पटसंख्या पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले.
     याप्रसंगी करकंब गावचे युवक नेते  अभिषेक भैय्या पुरवत सुनिल मोहिते मेंबर(माजी ग्रामपंचायत सदस्य) वरुण पुरवत, बंडू खपाले, ओंकार जाधव, प्रसाद पलंगे, संदिप शिंगटे,रहीम बागवान, बंडू माने तसेच या शाळेतील मुख्याध्यापिका श्रीम.अनिता वेळापूरकर मॅडम, सौ. चंद्रकला खंदारे मॅडम, श्री. रविकिरण वेळापूरकर सर आणि श्री. बालाजी मुदगडे सर इत्यादी उपस्थित होते.