* करकंब विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शहाजी काळे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ केमकर यांची निवड*.
: करकंब /प्रतिनिधी:
सालाबाद प्रमाणे याहीवर्षी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त व पत्रकार दिनानिमित्त आज करकंब विभाग पत्रकार संघाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या करकंब विभाग पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शहाजी काळे तर उपाध्यक्षपदी विश्वनाथ केमकर यांची, खजिनदार लक्ष्मण शिंदे कार्याध्यक्षपदी लक्ष्मण जाधव सचिव पदी राजेंद्र करपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
: या करकंब विभाग पत्रकार संघाच्या निवडी प्रसंगी श्रमिक पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे सागर
थिटे सर, भीमा व्यवहारे गोपीनाथ देशमुख मनोज पवार ऋषिकेश वाघमारे नितीन खाडे आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.