*राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे राज्याच्या दौऱ्यावर* *शुक्रवार दि 6 आगस्ट पासून नियोजित दौरा सुरू*  *10आगस्ट पर्यंत पहिल्या टप्यात विदर्भातील जिल्हानिहाय पदाधिकारी बैठकीचे नियोजन*

*राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे राज्याच्या दौऱ्यावर*  *शुक्रवार दि 6 आगस्ट पासून नियोजित दौरा सुरू*   *10आगस्ट पर्यंत पहिल्या टप्यात विदर्भातील जिल्हानिहाय पदाधिकारी बैठकीचे नियोजन*

   पंढरपूर/प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांनी आपल्या विभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीचा आणि बैठकाचा सर्व राज्यातील विविध जिल्ह्यमध्ये नियोजित कार्यक्रम आखला आहे. हा नियोजित दौरा आज शुक्रवार दि 6 आगस्ट पासून सुरू करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व जिल्ह्यमध्ये  बैठकीचे नियोजन सुरू केले असून दौरा सुरू झाला आहे.
    आज शुक्रवार पासून सुरू केलेला हा दौरा विदर्भातील विविध भागामध्ये10 आगस्ट पर्यंत राहणार आहे. 6 आगस्ट रोजी लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातील बैठका पार पडल्या आहेत.
   उद्या शनिवार दि 7आगस्ट रोजी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा दौरा होणार आहे.रविवार दि8आगस्ट रोजी गोंदिया भंडारा, आणि नागपूर तर 9 आगस्ट रोजी वर्धा यवतमाळ आणि अमरावती या भागाचा दौरा होणार आहे.10 आगस्ट रोजी अकोला, वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्यातील दौरा होणार आहे. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात विदर्भातील दौरा आटोपून दुसऱ्या टप्प्यात  मराठवाड्यात हा दौरा होणार असून त्या ठिकाणी दौऱ्याचे नियोजनही लवकरच कळविण्यात येणार असल्याचे नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.
     प्रदेशाध्यक्षपदी नव्याने जबाबदारी दिली असल्याने नागेशदादा फाटे यांनी आपल्या  राष्ट्रवादी उद्योग व व्यापार सेलचे राज्यभरातून चांगलीच बांधणी करण्यासाठी राज्यभरातून दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हानिहाय नवीन कार्यकारिणी आणि राज्यातील कार्यकारणी निवडी करण्याच्या दृष्टीने हा दौरा आयोजित केला आहे, या  दौऱ्यात पक्षबांधणीच्या दृष्टीने बैठकीचे नियोजन असल्याचे नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.
 आपल्यावर  देशाचे नेते खा.शरद पवार साहेब यांच्यासह  राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेतेमंडळी यांनी जी मोठी जबाबदारी दिली आहे, ती जबाबदारी पार पाडून सर्व राज्यात आणि तालुकास्तरावर उदयोग व व्यापार सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी निवडण्याची प्रक्रियेला  सुरुवात केली असल्याचे नागेशदादा फाटे यांनी सांगितले आहे.