*शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे शेतीची फवारणी यंत्राला 5 लाख रु अनुदान - महेश देवकते* -* महाराष्ट्र कृषी दिनाच्या पूर्वसंध्येला गावागावात कृषी संजीवनी अभियानांतर्गत जनजागृती अभियानाचे आयोजन*

*शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे शेतीची फवारणी यंत्राला 5 लाख रु अनुदान - महेश देवकते*  -* महाराष्ट्र कृषी दिनाच्या पूर्वसंध्येला गावागावात कृषी संजीवनी अभियानांतर्गत जनजागृती अभियानाचे आयोजन*

करकंब/प्रतिनिधी:-
      आधुनिक शेती पद्धतीत 50 लाख रु पेक्षा जास्त उत्पादन असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे शेतीची फवारणी यंत्र उपयोगी ठरू शकते अशा यंत्रांना शासनाकडून 5 लाख रु. अनुदान देण्याची योजना सुरू असून याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी बोलताना देवकते यांनी केले.
     1 जुलै महाराष्ट्र कृषी दिनाच्या पूर्व संध्येचे औचित्य साधून 25 जून ते 30 जून या कालावधीत गावागावात कृषी संजीवनी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर करकंब येथील कनकंबा मंदिरात आज दि 26 रोजी शेतकरी मेळावा घेण्यात आला होता.यावेळी करकंब कृषी मंडल अधिकारी महेश देवकते बोलत होते. 
 यावेळी बोलताना देवकते यांनी शेतकऱ्यांना महा डी.बी.टी वरील विविध योजना,बेदाणा शेड, नेटिंग मशीन,यांत्रिकीकरण औजार बँक,प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना(पी एम एफ एम इ) तसेच फळबाग लागवड आदींसह विविध योजना विषयी माहिती सांगितली.
     यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी पी.एम. झोळ,कृषी सहाय्यक यु.ए. लिंगे,डी. जी.खोत,शेतकरी गणेश गुळमे,अजित देशमुख,राजेश शेटे,महिबूब बागवान,बापू शिंदे,अमोल शिंदे,योगेश व्यवहारे,आबा धायगुडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :-
शेतकऱ्यांनी वाचला तक्रारीचा पाढा 
- करकंब येथील बंद असलेले कृषी कार्यालय पर्यायी जागेत सुरू करण्याची मागणी.
- ऑनलाइन योजनांमध्ये दिरंगाई होत आहे.
- एस.ओ.पी. व इतर रासायनिक खतांची विक्री दररोज चढ्या दराने होत आहे.
- शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माहितीसाठी कृषी कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी.
- विविध योजना या लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी.
- शेततळे खोदाई अनुदान हे लवकरात लवकर देण्यात यावे.