*करकंब व परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन..*.!
करकंब /प्रतिनिधी
करकंब येथील पोस्ट ऑफिस येथे पंढरपूर अंतर्गत आधार मोबाईल लिंकिंग विशेष शिबिराचे दिनांक २९/९/२०२१ ते ३०/९/२०२१ कालावधीत सकाळी 9 ते संध्याकाळी पाच वाजता या वेळेत आयोजन केले आहे. या मोहिमेअंतर्गत आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे ई-मेल आयडी लिंक करणे अशी सर्व कामे केली जातील. या योजनेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर पंढरपूर विभाग पंढरपर पी.ई.भोसले यांनी केले आहे. शासनाच्या विविध डीबीटी योजने अंतर्गत पी एम किसान शिष्यवृत्ती एन आर एस, पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळवण्यासाठी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट इत्यादी काढण्यासाठी वन नेशन वन रेशन कार्ड आधी योजनेसाठी आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक असल्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्यावा.