*प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांची सुविधा केंद्र...!*!

पंढरपूर / प्रतिनिधी
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित प्रोग्रेस माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, प्रशांतराव परिचारक नगर,पंढरपूर या महाविद्यालयांस बहिस्थ कोर्सेसचे" सुविधा केंद्र" म्हणून मान्यता मिळाली असल्याचे संस्थेचे सचिव संकेत खंडागळे यांनी सांगितले.पदवी व पदव्युत्तर कोर्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.यामध्ये बी.ए ,बी.कॉम,एम.ए,एम.कॉम, बी.बी.ए, बी.लिब, एम.लिब,इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार आहेत. तरी पंढरपूर शहरातील व इतर भागातील गरजू विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.