*विठ्ठल परिवाराचे आशास्थान ,उद्योजक अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन*!

पंढरपूर (प्रतिनिधी)
पंढरपूर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक, डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस असून ,या निमित्ताने त्यांचा चाहता वर्ग, स्नेही तसेच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, अन्नदान , गरजू लोकांना किराणा मालाचे वाटप, वृक्षारोपण, कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान आदी अनेक विधायक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचवेळी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी मदत पाठविली जाणार आहे.
आपल्या विधायक तसेच उद्योगशील स्वभावाने परिचित असलेले उद्योजक अभिजीत पाटील , अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. डीव्हीपी उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी वाटचाल करीत , पंढरपूर तालुक्यातील अनेक लोकांना नवउद्योजक होण्याची स्वप्ने दाखवली आहेत . येथील युवकांसाठी ते आयकॉन ठरले आहेत.तरुण नवउद्योजकांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करून ,अर्थकारणाच्या वाटेवर यशस्वी होण्यास प्रोत्साहित करण्याचे काम त्यांच्याकडून कायमचं होत असते. यामुळेच पंढरपूर तालुक्यातील राजकीय वर्तुळातही अभिजीत पाटील यांचा प्रभाव वाढल्याचे दिसत आहे. आपल्या उद्योजकीय कार्यपद्धतीतून राजकारण आणि त्यातूनच विकास असे धोरण बाळगलेल्या अभिजीत पाटील यांचे मनोबल राजकारणातही तितकेच वाढले आहे. याचा प्रत्यय सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण्यांना येत आहे.