*दोन किलोमीटर  च्या रस्त्यावर दोनशे खड्डे.... ठेकेदार बांधकाम विभागाची चाहूल आहे कोणाकडे....!* *खड्डे चुकवा जीव वाचवा.*

*दोन किलोमीटर  च्या रस्त्यावर दोनशे खड्डे.... ठेकेदार बांधकाम विभागाची चाहूल आहे कोणाकडे....!*  *खड्डे चुकवा जीव वाचवा.*

करकंब/ प्रतिनिधी:

भारत सरकारच्या रस्ते मंत्रालयाच्या माध्यमातून नामदार नितीन गडकरी यांनी देशांतर्गत अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उदात्त हेतूने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून रस्त्यांचे जाळे निर्माण केले पण आजही ग्रामीण भागातील राज्यमार्गावरील रस्त्यांना प्रचंड निधी उपलब्ध करूनही केवळ ठेकेदाराच्या मनमानी कारभार मुळे आणि संबंधित बांधकाम उपविभागाचे असलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे गेल्या तीन महिन्यापासून करकंब व या परिसरातून येणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना याचा प्रचंड मानसिक त्रास होत आहे. करकंब व परिसरातील नागरिकांनी वाहनधारकांनी  त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, व राष्ट्रवादी च्या युवकांनी निवेदन देऊनही संबंधित ठेकेदार काम चालू करत नसल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. करकंब चौक (शंकर नगर) ते मोडनिंब चौक हा दोन किलोमीटरचा रस्ता असून गेल्या पावसाळ्याच्या पूर्वी संबंधित संघटनेच्या द्वारे पक्षा द्वारे नागरिकांनी वेळोवेळी लेखी तोंडी सांगूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका घडत आहे. या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर स्मशान भूमी पासून ते करकंब चौकापर्यंत त्यावर मोठमोठे दीड ते अडीच फुटापर्यंत खड्डे पडल्याने वाहनधारकांचे सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. खड्डे चुकवा आणि जीव वाचवा अशी मोहीम स्वतःहून या वाहनधारकांना व नागरिकांना गेल्या वर्षभरापासून करावी लागत आहे. या दोन किलोमीटर च्या रस्त्यावर दोनशे खड्डे... हे केवळ ठेकेदार बांधकाम विभाग याच्या निष्काळजीपणामुळे सामान्यांच्या मृत्यूला अपघातास जबाबदार आहेत. गडकरी साहेब तुम्ही रस्त्याच्या बाबत मोठ्या प्रमाणात निधी देता पण हे ठेकेदार संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी च्या पदराआड लपून निकृष्ट दर्जाचे काम तर करतात पण हे काम मंजूर असतानाही या कामाला पावसाळा संपला तरी अजून सुरुवात केली नाही त्यामुळे सातत्याने या रस्त्यावर अपघात घडत आहेत मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. अशा शासनाच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या दरोडेखोरांनामुळे सातत्याने घडत असलेल्या अपघाताने सामान्य नागरिकांचा वाहनधारकांचा यामध्ये नाहक बळी जात आहे.

करकंब येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग हे पावसाळ्या पूर्वी सातत्याने सांगायचे की   पावसाळा झाल्यानंतरया रस्त्याचे काम सुरू करायचे आता पावसाळा संपून सहा महिने उलटले काम मंजूर आहे तरीही अद्याप या रस्त्याच्या कामास सुरुवात नाही. करकंब चौक(शंकर नगर) ते मोडनिंब चौक ते नवरा नवरी पर्यंत (मोडनिंब रोड) हे काम मंजूर आहे .पण ठेकेदार काम करण्यास सुरुवात करत नाही .असे वारंवार बांधकाम विभागाकडून सांगितले जाते. आजूबाजूला सगळीकडे रस्त्याची कामे जोरात सुरू आहेत पण याच कामाला मुहूर्त का लागेना हे न उलगडणारं कोडं आहे का? असा सवाल सामान्य जनतेतून विचारला जात आहे. अजून किती अपघात घडणार आहेत . अजून किती जणांचे या अपघातामुळे बळी जाणार आहेत याची वाट तर हे ठेकेदार व संबंधित बांधकाम विभागात पाहत तर नाही ना अशी संतप्त प्रतिक्रिया लोकांमधून  व्यक्त केल्या जात आहे.

चौकट-करकंब चौक (शंकर नगर) मोडनिंब चौक ते नवरा नवरी पर्यंत (मोडनिंब रोड) हा रस्ता मंजूर असून यापूर्वी संबंधित ठेकेदारास काम सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

श्री डी वाय पाटील. उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय करकंब.