*विविध उद्योगाची माहिती ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यासाठी 'उद्योग रथ' फिरविणार : नागेश फाटे* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाची राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक उत्साही वातावरणात पडली पार* *राष्ट्रवादी भवन पुणे येथे सोमवारी झालेल्या बैठकीला राज्यभरातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती* ...

.
पंढरपूर/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाची राज्यस्तरीय बैठक सोमवारी राष्ट्रवादी भवन पुणे येथे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही वातावरणात पार पडली .
यावेळी पूणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप , राहुल जगताप , बाळासाहेब देशमुख ,केतन सदाफुले ,दिनेश मोरे, निलेश शहा , मनीषा ताई भोसले , राजकुमार माने, कल्याण कुसूमडे , भोलासिंग अरोरा यांच्या उपस्थितीत पार पडली .
यावेळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील आलेल्या राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी , विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष , शहराध्यक्ष, महिला अध्यक्षा, तालुकाध्यक्ष यांनी आपल्या भागातील अडचणी मांडल्या. त्यामध्ये कुठल्याही उद्योगाची फ्रॅंचाईजी स्वीकारताना तरुणांनी काळजी घ्यावी , मोठ्या इंडस्ट्रीमध्ये कामगारांची कमतरता आहे तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागात नवीन उद्योग ची माहिती शेतकऱ्या पर्यंत पोहोचण्यासाठी "उद्योग रथ " बनवून नाविन्यपूर्ण उद्योगाची माहिती प्रत्येक जिल्ह्यात हा रथ फिरवून पोहचवणे अशा सूचना पदाधिकारी यांनी मांडल्या .
यावेळी उत्तर देताना श्री नागेश फाटे यांनी भारत हा जगातील सर्वाधिक तरुणांचा देश आहे तरुणांचा कल " स्टार्टअप" आणि उद्योग व्यापाराकडे आहे वेगाने बदलणाऱ्या या जगात आपल्याला संघटनेत सुद्धा बदल जुळवून घ्यावे लागतील, राजकारणाचा परिघ औद्योगिक क्षेत्रात विस्तारत आहे सर्वांना नोकरी शब्द नसल्याने उद्योग व व्यापार याकडे पुढील काळात लोकांचा जास्त भरणा असणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक उद्योगात आदरणीय पवार साहेबांना व त्यांच्या विचारांना माननारी माणसे आहेत त्यांची संघटनात्मक बांधणी आपण सर्वजण करण्याबाबत चर्चा करण्यात आली .
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुका नंतर नवी राजकीय चौकट उभी राहत आहे .त्यामुळे भाजपाच्या विस्तारवादी राजकारणाला तोंड देण्यासाठी हा विभाग अत्यंत मजबूत, सक्षम आणि सुधारणावादी बनवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आणि संघटनेची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनेही संपूर्ण राज्यभर सदस्य नोंदणी अभियान आपण राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यस्तरीय हेल्पलाइन उभी करून या हेल्पलाइन च्या मदतीने ने उद्योग व व्यापारात येणाऱ्या अडचणींचे निवारण करणे व्यापाऱ्यांशी संवाद साधने व त्यांचे प्रश्न सोडवणे,शेतीपूरक "स्टार्ट अप "लोकांना सोबत घेणे,शेती मार्गदर्शन संवाद घडवणे व राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कार्यक्रम राबवणे हे आपले ध्येय असून राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा . श्री . अजितदादा पवार साहेब, श्री जयंतराव पाटील साहेब, संसदरत्न खा. सौ सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शना खाली हा उद्योग व व्यापार विभाग सर्वांच्या मदतीने सक्षम बनवणे हे आपले उद्दिष्ट आहे असे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी सांगितले .
यावेळी संजय पाटील,राजेंद्र चव्हाण , प्रल्हाद डिसले, राजकुमार गुगळे, प्रशांत देवरे, मुराद अडरेकर , धनराज खिराडे, प्रभाकर देशमुख , इरफान शेख ,श्रीकांत मुळे, मनीष रावल, धिरज सोनवणे , सुभाष गव्हाणे , पंकज सावंत ,अशोक चोरडिया , सचिन चव्हाण , शिवकुमार सहानी ,अभिजित शहा ,रीया भांबुरे , मोनिका जाधव ,अर्चना पाटील ,ज्योती अंबीरे , आशा कार्लाकर , अश्विनकुमार खैरनार ,संभाजी पाटील, रुपेश चव्हाण ,गिरीश नोरले ,रविंद्र सोनवणे सह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते .