*बोर्डो मिश्रण एक उत्तम बुरशीनाशक-कृषिदूत रोहित कदम*
पंढरपूर:-प्रतिनिधी
महाराष्ट्रात अनेक पिकांवर विशेषता फळझाडे व भाजीपाला यावर बुरशीचा प्रादुर्भाव ही एक गंभीर समस्या आहे पिकांवर येणाऱ्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण हे एक उत्तम बुरशीनाशक आहे असे मत कृषिदूत रोहित कदम याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज आयोजित ग्रामीण जागृकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत व्यक्त केले.
बोर्डो मिश्रण हे चुना आणि मोरचूद या दोन घटकांपासून बनवलेले मिश्रण असते शेतामध्ये येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बोर्डो मिश्रण कसे तयार करावे मिश्रण तयार करताना चुना व मोरचूद आणि पाणी यांचे प्रमाण किती असावे कोणत्या पिकासाठी किती व कसे प्रमाण वापरावे तसेच बोर्डो मिश्रण बनविताना व वापरताना घ्यावयाची काळजी आणि बोर्डो मिश्रणाची उपयोगिता कशी तपासावी याबद्दल कृषिदूत रोहित कदम याने प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना माहिती दिली त्या करिता त्याला विषय शिक्षक प्राध्यापक डी.एस.ठवरे तसेच त्याकरिता अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील,रत्नाई कृषी महावद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी. नलवडे, प्रा.एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत,प्रा. डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यावेळी नांदोरे गावातील शेतकरी कालिदास कदम ,महावीर कदम, सोमनाथ वाघ, युवराज कदम इत्यादी शेतकरी उपस्थित होते.