* नागेश फाटे यांच्या एन . पी . कन्स्ट्रक्शन कंपनीचा १४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा*..

पंढरपूर / प्रतिनिधी
१ जानेवारी २०२२ नववर्षाची सुरुवात झाली असून ,याच दिवशी राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या एन .पी. कंन्स्ट्रक्शन कंपनीने आज आपल्या कंपनीचा १४ वा वर्धापन दिन कोरोणाचे नियम पाळून उत्साहात साजरा केला .
नागेश फाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १३ वर्षांपूर्वी अतिशय अल्प भांडवलात आपल्या व्यवसायास सुरुवात करून, आज संपूर्ण महाराष्ट्रात एन .पी . कन्स्ट्रक्शन कंपनी ने एक विश्वास व आपल्या उद्योगाचे जाळे निर्माण केले आहे . आज एन .पी. कंन्स्ट्रक्शन, एन .पी. इंडस्ट्रीज , एन.पी.एच.डी.डी., एन .पी. स्टोन क्रशर , एन.पी. पोल्ट्री फार्म, शुभम कृषी केंद्र अशा अनेक कंपन्या काढून कंपनीने आपली यशस्वी घौड दौड चालू ठेवली आहे कंपनीचा सर्व स्टाफ अतिशय विश्वासाने कंपनीत कार्यरत असून ए .पी .कंन्स्ट्रक्शन चे मालक श्री .नागेश फाटे व त्यांचा संपूर्ण परिवार या उद्योगात झोकून देऊन काम करत आहे त्यामुळेच गेले १३ वर्षांमध्ये कंपनीने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आज वर्धापन दिन साजरा करत असताना अनेक मान्यवरांनी भेटी देऊन कंपनीचे मालक व त्यांच्या परिवाराचा सन्मान करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या ..