*आठ दिवसात सुधारणा नाही झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणार.* *करकंब स्मशान भूमी चा प्रश्न आता पंचायत समितीच्या दारात,...*....!

*आठ दिवसात सुधारणा नाही झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करून ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकणार.* *करकंब स्मशान भूमी चा प्रश्न आता पंचायत समितीच्या दारात,...*....!

करकंब/ प्रतिनिधी:

करकंब येथील स्मशानभूमी बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या वतीने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्यातच आज मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन गट विकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर यांना लेखी निवेदन देऊन या स्मशान भूमी बाबत आठ दिवसात सुधारणार नाही केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करून करकब ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा लेखी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. करकंब ग्रामपंचायतीच्या माहिती बाबतचा प्रश्न अजून प्रलंबित असताना त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेऊन हा प्रश्न गट विकास अधिकारी यांच्या दारात नेला आहे यावर गट विकास अधिकारी काय भूमिका घेतात की यापूर्वी ग्रामपंचायतीच्या विरोधकांना जशी तोंडाला पाने पुसली तसे काम करतात का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
       या निवेदनामध्ये स्मशानभूमीची झालेली दुरावस्था, या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांची पिण्याच्या पाण्याची व मयता साठी लागणाऱ्या पाण्याची कसलीही सोय नाही. त्यातच सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. स्वच्छतेबाबत कायम उदासीनता पसरलेली आहे. बऱ्याच ठिकाणी बसवण्यात आलेली सोलर पॅनल ही निकामी झालेले आहेत. याकडे ग्रामपंचायतचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. तरी या संदर्भात मनसेतर्फे दिनांक-२२/३/२०२१ रोजी सरपंच ग्रामसेवक उपसरपंच करकंब ग्रामपंचायतीस लेखी निवेदन दिले होते. परंतु आजतागायत पणे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन त्यांना दिलेल्या समस्या चे प्रथम लक्ष घालून येत्या आठ दिवसात ही कार्यवाही करावी. जर आपली स्तरावरून गंभीर दखल नाही घेतल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाईलने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करून कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.
      हे निवेदन देतेवेळी महाराष्ट्र निर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील पंढरपूर तालुका उपाध्यक्ष हेमंत पवार करकंब शहराध्यक्ष संजय गायकवाड करकबविभाग अध्यक्ष गौरव शिंदे पंढरपूर तालुका विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन माळी बालाजी पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक उपस्थित होते.