*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्षपदी सुनील धोत्रे यांची निवड.. !* *करकंब सह परिसरात अभिनंदन वर्षाव.*

..
करकंब /प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करकंब येथील युवा उद्योजक -सुनील भाऊ धोत्रे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष- महेंद्र पवार ,व्यापारी सेलचे जिल्हा अध्यक्ष -जयवंत भाऊ भोसले उद्योजक- बाजीराव काळे, संजय मोहिते, संजय धोत्रे ,गणेश पिंपळनेर अदि पदाधिकाऱ्यांसह मनसे सैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
युवा उद्योजक नवनिर्वाचित वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील धोत्रे यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले जात असून या पुढील काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष- राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सेनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करून प्रामाणिकपणाने न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन जिल्हा उपाध्यक्ष- सुनील धोत्रे यांनी सांगितले.