*सहकार शिरोमणीचे व्हा चेअरमन पदासाठी नागेश फाटे यांच्या नावावर होणार एकमत?* *सर्व समावेशक नेतृत्व असल्याने होणार उद्या होणार शिक्कामोर्तब!*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधारी काळे गटाची सत्ता कायम राहिली आहे. आता या कारखान्याच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदासाठी उद्या मंगळवारी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यामधून चेअरमन पदासाठी विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांची निवड होणार हे निश्चित आहे. मात्र व्हा. चेअरमन पदी कोणाची वर्णी लागणार यासाठी तालुक्यातील विठ्ठल परीवारामधून उस्तुकता वाढली आहे.
पंढरपूर तालुक्यातील राजकारणात या सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे तितकेच महत्त्व आहे.यामुळे या कारखान्यावर पदाधिकारी निवडतानाही राजकीय वजनदार आशा व्यक्तीची निवड करणे गरजेचे आहे.
या कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक कधी न झालेली अशीअत्यंत चुरशीची झाली होती. यामुळे पुढील कालावधीत या कारखान्याला जबाबदार असे पदाधिकारीही देणे गरजेचे आहे. चेअरमन कल्याणराव काळे यांच्याकडे एकहाती कारभार आहे. यामुळे काळे हे ज्या संचालक यांच्या पाठीवर थाप मारतील . तो संचालक व्हा. चेअरमन पदासाठी पात्र ठरणार आहे.
कारखान्याचे कामकाज पाहताना शासन दरबारी असलेल्या कामासाठी चेअरमन यांचे खांद्याला खांदा लाऊन काम करणारे नाव पाहता. या संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेस चे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे यांची मदत होणार आहे. फाटे यांच्या उमेदवारीने त्यांच्या गादेगाव आणि परिसरातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. फाटे यांना व्हा. चेअरमन मिळाल्यास त्यांचा कोणताही वैयक्तिक आर्थिक भुर्दंड कारखान्यावर होणार नाही . यामुळेच नागेशदादा फाटे हेच व्हा.चेअरमन पदासाठी योग्य उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.
मंगळवारी होणाऱ्या या वरील निवडीमध्ये नेमके कोणत्या उमेदवारास व्हा. चेअरमन पद मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र हे सर्व चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हातात असल्याने, ते आता कोणास व्हा. चेअरमन देणार याकडे सर्व सभासद यांच्यासह राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.