तर जयंत पाटील यांच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार * अतुल खुपसे पाटील यांचा इशारा
प्रतिनिधी / पंढरपूर
22 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयातील आज टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याच्या निर्णयाला परवा राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती देऊन तो आदेश रद्द केला असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले मात्र आज तीन दिवस उलटून गेले तरी याबाबत अजून कुठलाच अध्यादेश निघाला नाही त्यामुळे या ठिकाणी देखील यांची दिशाभूल जाणवली येत आहे म्हणून 25 मे पर्यंत हा निर्णय रद्द झाल्याचा अध्यादेश नाही निघाला तर राज्याचे जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी दिला.
पुढे बोलताना खूपसे पाटील म्हणाले की,
दि. 22 एप्रिल रोजी सोलापूर जिल्ह्यातील हक्काच्या उजनी जलाशयातील पाणी 'सांडपाणी' या गोंडस शब्दाचा वापर करून बारामतीकरांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविले. या निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेते आक्रमक झाले आणि जिल्हाभर आंदोलनाचा भडका उडाला. शेतकऱ्यांच्या व शेतकरी नेत्यांच्या आक्रमकपणामुळे व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी भविष्यात पूर्णपणे नष्ट होईल या भीतीने बारामतीकरांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर इंदापूर ला पाणी नेण्याचा आदेश रद्द केल्याचे सांगितले. मात्र मंत्री जयंत पाटील यांनी ते वक्तव्य करून जवळपास तीन दिवस उलटले आहेत. तरीही याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही. ज्याप्रमाणे 'सांडपाणी' हा शब्द वापरून मुख्यमंत्र्याची दिशाभूल केली व सोलापूरकरांना वेड्यात काढण्याचा निरर्थक प्रयत्न केला त्याच प्रमाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीची पिलावळ घेऊन माध्यमांसमोर व्हिडिओ देऊन पुन्हा एकदा दिशाभूल करू नका असा इशारा यावेळी खूपसे पाटलांनी दिला असून येत्या पाच दिवसात म्हणजे २५ मे पर्यंत हा अध्यादेश निघाला नाही तर जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.
यावेळी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे सचिव माऊली हळणवर,कार्याध्यक्ष सुहास घोडके, उपाध्यक्ष बापु मेटकरी, सहसचिव किरण भांगे, दिपक भोसले, दिपक दादा वाडदेकर, सरचिटणीस आण्णा जाधव, खजिनदार अभिजित पाटील, प्रवक्ता चिमणदादा साठे, सदस्य धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, रुक्मिणी दोलतडे, बळीराम गायकवाड, आप्पासाहेब गवळी आदी उपस्थित
चौकट
राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा वाचवा
- उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी वळविण्याच्या निर्णय रद्द केल्याचे मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच लोकांच समक्ष सांगितले आहे तीन दिवस झाले मात्र याबाबत कुठलाही शासकीय अध्यादेश निघाला नाही त्यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार व शेतकऱ्यांचे खरेखुरे कैवारी तारणहार बबन दादा शिंदे यांनी दोन दिवसात अध्यादेश न निघाल्यास राजीनामा देऊ असे विधान एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा वाचवायचा असल्यास आणि पुन्हा पोटनिवडणूक लागू नये असे वाटत असल्यास पंढरपूर ची पुनरावृत्ती टाळायची असल्यास बारामतीकरांनी यासंदर्भातला अध्यादेश ताबडतोब जारी करावा.
माऊली भाऊ हळणवर
सचिव, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष