*कान्हापुरी गावाचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज-रणजीसिंह शिंदे* *शिवजयंतीचे औचित्य साधून 80 जणांनी केले रक्तदान.* .,. *कोरोना विषाणू संदर्भात लसीकरण मोहिमेबाबत केली जनजागृती.... आणि दिव्यांगांना रोख रकमेचे केले वाटप*

*करकंब/ प्रतिनिधी*
: कान्हापुरी ग्रामपंचायत चे सरपंच प्रेम भैया चव्हाण यांच्या माध्यमातून येथील भैरवनाथ प्रतिष्ठान कान्हापुरी व रणजितसिंह शिंदे युवामंच यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी समजून कान्हापुरी सारख्या ग्रामीण भागामध्ये आज रक्तदानाची गरज असताना या शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करून यामध्ये 80 लोकांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे या उपक्रमा बरोबरच गावातील दहा दिव्यांग अपंगांना 1000 रुपये याप्रमाणे रोख रकमेचे वाटप करून तसेच कोरणा विषयक विषाणू संदर्भात लोकांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण मोहीम बाबत जनजागृती व्हावी या उदात्त हेतूने आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम कान्हापुरी या गावाने केल्याने कान्हापुरी सारख्या ग्रामीण भागातील या कान्हापुरी गावचा आदर्श इतर गावांनी घेण्याची गरज असल्याचे मत माढा पंचायत समितीचे मा .सभापती रणजीत सिंह शिंदे यांनी व्यक्त केले.*
यावेळी सुरुवातीस शिव प्रतिष्ठापनेचे पूजन रणजीतसिंह भैय्या शिंदे यांच्या शुभहस्ते करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोपटमामा चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे, माजी सरपंच मोती दादा गोसावी, रघुनाथ चव्हाण, कान्हापुरी चे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व करकंब पोलीस ठाण्याचे कर्मचारी, भैरवनाथ प्रतिष्ठान कान्हापुरी, रणजीत सिंह शिंदे युवा मंच चे कार्यकर्ते तसेच कान्हापुरी जळवली उंबरे या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*