*नेमतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी धडाडीने काम करणार-सरपंच सौ. स्वाती अभिजीत पाटील.*

करकंब/ प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिलेल्या नेमतवाडी ग्रामपंचायत च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जनतेमधून सरपंच पदासाठी निवडणूक लढवून निवडून आलेले सौ. स्वाती अभिजीत पाटील. यांनी समविचारी ग्रामविकास पॅनल नेमतवाडी यांच्या माध्यमातून नेमतवाडी च्या सर्वांगीण विकासाचा ध्यास मनी ठेवून धडाडीने काम करणार असल्याचे समविचारी ग्रामविकास पॅनलच्या नूतन सरपंच सौ . स्वाती अभिजीत पाटील. यांनी बोलताना सांगितले.
नेमतवाडी पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समविचारी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार - बबनदादा शिंदे, महेश नाना साठे, कल्याणराव काळे, अभिजीत आबा पाटील, गणेश दादा पाटील या सर्वांच्या मार्गदर्शनातून गावातील जेष्ठ आणि युवा वर्गांची मूठ बांधून जनतेने दिलेल्या लोक मताचा आदर राखून यापुढे गावच्या विकासासाठी काम करण्याची संधी निर्माण करून दिली .या संधीचे सोने करून गावचा विकास आणि नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन सरपंच सौ. स्वाती अभिजीत पाटील. यांनी सांगून गावातील रस्ते , वीज, पाणी ,आरोग्य व इतर मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न करणार.
नेमतवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये आरोग्य उपकेंद्र व्हावे. यासाठी सर्व मार्गदर्शकाकडे सातत्याने पाठपुरावा करून लोकांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे गावातील महिलांसाठी महिला बचत गट या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मिती आणि या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करुन तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी, खासदार सहायता निधी, आमदार साहेब निधी, जिल्हा परिषद निधी ,व पंधरावा वित्त आयोग तसेच इतर निधीच्या माध्यमातून गावातील तळागाळातील लोकांना विशेषतः महिला वर्गांना लाभ मिळवून देण्यासाठी यापासून कोणीही वंचित राहू नये . म्हणून महिला सरपंच या नात्याने काम करीत राहणार असल्याचे सरपंच सौ स्वाती अभिजीत पाटील. यांनी सांगितले.
नेमतवाडी ग्रामपंचायत च्या आजपर्यंतच्या या सरपंच पदी बऱ्याच महिला सरपंच झाल्या असून परंतु प्रथमच बी. ए. बी. एड अशा सुशिक्षित सरपंच म्हणून सौ. स्वाती अभिजीत पाटील. यांची लोकमातातून निवड झाल्याने निश्चितच नेमतवाडी गावचा नावलौकिक वाढेल. असा आत्मविश्वास लोकांमधून व्यक्त केला जात आहे.