ज्ञानदीप मध्ये जिल्हास्तरीय खो-खो,कबड्डी स्पर्धा संपन्न*
करकंब/ प्रतिनिधी :-
नांदोरे येथील ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये जिल्हास्तरीय खो-खो ,कबड्डी स्पर्धा पार पडल्या.प्रारंभी दीपप्रज्वलन केले ,संस्थेचे अध्यक्ष किरण भिंगारे ,उमेश कदम , संजय गवळी ,हेमंत बरडे, प्रा.जमदाडे ,शंकर तोडले ,सुनील बाबर यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.

या स्पर्ध मध्ये एकूण 37 संघांनी सहभाग नोंदवला गेला त्यामध्ये आदर्श प्राथमिक शाळा शेवते, ज्ञानदीप प्रोग्रेसिव्ह स्कूल नांदोरे, जि. प. बाबरवस्ती कोंढारपट्टा, तुंगेश्वर प्रशाला तुंगत,पट - कुरोली प्रशाला पट कुरोली विजेतेपद पटकावलेआहे. या स्पर्धे साठी पंच म्हणून कुंडलिक तळेकर,अमोल मस्के, प्रदीप।माळी, विनोद पिसे,विश्वास जवलेकर,सतीश बाबर व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश इंगोले यांनी केले.