*तो पुल बनला मृत्यूचा सापळा.*!., *ग्रामस्थांनी दिले आ बबनदादा शिंदे यांना निवेदन*

करकंब/ प्रतिनिधी
करकंब येथील धाकटी वेस ते जळवली चौक या रस्त्यावर ओढ्यातील पाणी आल्याने गावातील त्यातच वाड्या-वस्त्या वरील विद्यार्थी शेतकरी व्यापारी ग्रामस्थ सर्वसामान्य नागरिकांना जाताना व येताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा बनला असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे पूर्णता दुर्लक्ष होत आहे.
ग्रामस्थांची होणारी ही गैरसोय व कुचंबणा व हा पूल धोकेदायक झाल्याने या धाकटी वेस ते जळवली चौक या रस्त्यावरील पूलाची उंची वाढवण्या बाबतचे निवेदन माढा- पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबन दादा शिंदे यांना अजित्सिंह देशमुख कार्याध्यक्ष पंढरपूर विधानसभा राष्ट्रवादी युवक कांग्रेस, मिथुन चंदनशिवे अध्यक्ष पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा, विजय जाधव सर, उद्योजक नितिन दुधाळ, अशोक देशमुख महेश गुजरे रामचंद्र सलगर डॉक्टर चव्हाण संतोष शिंदे राजेंद्र खारे भैरवनाथ चाफळकर शैलेश जवारेआदींनी याबाबतचे निवेदन देऊन आमदार बबनदादा शिंदे यांच्यासमोर समस्या मांडली.