*पंढरीत सोमवारी महाविकास आघाडीचा मूक मोर्चा* *सहकार शिरोमणीचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते कल्याणराव काळे यांचे आवाहन*

*पंढरीत सोमवारी महाविकास आघाडीचा मूक मोर्चा* *सहकार शिरोमणीचे चेअरमन आणि राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते कल्याणराव काळे यांचे आवाहन*

पंढरपूर /प्रतिनिधी

राष्ट्रीय नेते, शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानवर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ सोमवार दि.11/04/2022 रोजी पंढरीत महाविकास आघाडीच्या वतीने मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे .अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.

शुक्रवारी अज्ञात इसमाने घोषणाबाजी करत राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे निवास्थानवर बेकायदेशीररित्या जमाव जमवून घोषणाबाजी करत हल्ला केला. वास्तविक पवार साहेब यांचा एस.टी.महामंडळाचा अथवा त्या सबंधीत कोणत्याही घटनेची प्रत्यक्षदर्शनी संबंध नसताना त्यांच्यावरती झालेला हल्ला हा पुर्वनियोजित राजकीय हेतून करण्यात आलेला आहे. गेली 50 वर्षाहून आधिक काळ देशाच्या व राज्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या पवारसाहेबांनी एस.टी.महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून न्याय देण्याची भुमिका घेतली असून सर्वाच्य न्यायालयाच्या निकालानूसार एस.टी.कर्मचाऱ्यांचे आंदोलन न्याय प्रविष्ट आहे. असे असताना पवारसाहेबांच्या निवास्थानावर झालेल्या हल्याची चौकशी करुन दोषींवर तीव्र कारवाई करण्यात यावी या मागणीकरीता सोमवारी सकाळी 09.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथून मुक मोर्चास सुरुवात होणार असून स्टेशन रोड मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात येईल. या मोर्चामध्ये महाविकास आघाडीमधील पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कल्याणराव काळे यांनी केले आहे.