*राज्यात घोडेबाजाराची चर्चा.... तर गावोगावी.. पेट्रोल.. वाढत्या महागाईमुळे घोड्यावर झाले स्वार....!* *महागाई साठी आंदोलन करणारे गेले कुठे...?*

करकंब /प्रतिनिधी:-
सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सामान्य माणूस विशेषता महिलावर्ग वाढत्या महागाईपासून प्रचंड त्रस्त झाला असून त्यातच भडकत्या पेट्रोलचे आणि गॅसच्या दरवाढीमुळे तर सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना सध्या सर्व टीव्ही चॅनल वर घोडेबाजाराची चर्चा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सुरु असून असे असतानाही अशा दरवाढीमुळे आणि महागाईमुळे चक्क 65 वर्षीय वृद्ध घोड्यावर स्वार होऊन आपल्या प्रपंचाला लागणाऱ्या कमी-जास्त संसारोपयोगी खरेदी करण्यासाठी असल्याचे चित्र दिसून येत आहे. चर्चा मात्र करकंब सह पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे.
सर्व सामान्य नागरिक, मजूर वर्ग, मध्यमवर्गीय, असो नोकरदार विशेषता महिलावर्ग या लोकांना या महागाईची प्रचंड झळ सोसावी लागत असेल तरी सांगायचे कुणाला ...? तोंड दाबून.... बुक्क्याचा मार....! अशी गत झाल्याने सर्वसामान्य मात्र हैराण झाला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षाच्या काळात महागाईच्या संदर्भात आंदोलन करणारी पक्ष ..संघटना.. कुचकामी ठरल्याने या महागाई बाबत आंदोलन करून रस्त्यावर उतरणारी गेली कुठे....? याचीही चर्चा सर्व सामान्यातून केली जात आहे.