*उद्या खा. शरद पवार विठ्ठल साखर कारखान्यावर* *चेअरमन अभिजीत पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाकडे लक्ष* *बायो सीएनजी प्रकल्प भूमिपूजन प्रसंगी पार पडणार विठ्ठल परिवाराचा शेतकरी मेळावा*

पंढरपूर/प्रतिनीधी
पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर उभारण्यात येणाऱ्या बायो सीएनजी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या रविवार सकाळी ९वाजता होणार आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन खा. शरद पवार यांच्या हस्ते तर आ. रोहित पवार यांच्या उपस्थित होणार आहे.
मागील चार दिवसापूर्वीच चेअरमन अभिजीत पाटील यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण खा.शरद पवार यांना दिले . त्यावेळी हे उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे
.
या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी विठ्ठल परिवारातील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खा. ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री दिलीप सोपल, आ. बबनदादा शिंदे,आ.रवींद्र धंगेकर ,आ. कैलास पाटील, माजी आमदार राजन पाटील,आ. संजयमामा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, दत्तात्रय सावंत, धनाजी साठे, प्रवीण गायकवाड, बळीरामकाका साठे,उमेश पाटील, उत्तम जानकर,शिवाजीराव काळूंगे, डॉ बी.पी रोंगे, मनसे नेते दिलीप धोत्रे, साईनाथभाऊ अभांगराव, प्रकाशतात्या पाटील, नंदकुमार पवार,पी. बी. पाटील सर, दामोदर देशमुख, राहुल शहा, तानाजी खरात, सुभाष भोसले, नागेश फाटे,विष्णूभाऊ बागल, संतोष नेहतराव, अरूनाताई माळी, यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील महविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
विट्ठलच्या उभारनी पासुन खा. शरद पवार यांचे व्यक्तिशालक्ष आहे. यामुळे आजवरचा विठ्ठल परिवार हा कायम खा. शरद पवार यांच्या पाठीशी उभा आहे.
विठ्ठलची निवडणूक पार पडली .यामध्ये अभिजीत पाटील यांनी सत्ता मिळवली आहे. मात्र त्यांचा राजकीय पक्ष नेमका कोणता हे समजले नाही.यामुळे आता खुद्द खा.शरद पवार याठिकाणी येत आहेत.यामुळे चेअरमन अभिजीत पाटील राष्ट्रवादी पक्षात अधिकृत प्रवेश करणार की काय याकडे विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.