*रोपळे येथील विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोहन काळे यांची निवड*

*रोपळे येथील विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोहन काळे यांची निवड*


करकंब , /प्रतिनिधी

रोपळे ( ता. पंढरपूर ) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री . शिवाजीभाऊ बाबा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोहन विठ्ठल काळे यांची बिनविरोध निवड झाली . त्यांच्या या निवडीचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे . 

रोपळे पंचक्रोशीत नावाजलेल्या या विद्यालयात मेंढापूर, येवती , आष्टी , बाभूळगाव, तुंगत व खरातवाडी येथील विद्यार्थी -विद्यार्थीनी शिक्षणासाठी येतात . सुमारे एक हजार दोनशे विद्यार्थी पट असलेल्या या विद्यालयात नुकतीच तानाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पालक - शिक्षक सहविचार सभा घेण्यात आली . या सभेत शासनाच्या आदेशाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली . निवड झालेल्या सदस्यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोहन काळे यांचे नाव सुचविले . या नावाला कोणाचाही विरोध झाला नाही . या प्रशालेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते . अशा परिस्थितीत श्री . काळे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली . त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे . यावेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील , वाशीम जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिक्षक शिवाजी भोसले , प्रशालेचे मुख्याध्यापक बिभिषण पाटील , पर्यवेक्षक चंद्रकांत पाटील , पालक व शिक्षकांनी अभिनंदन केले . 
--
कोट : या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी मला हक्कापेक्षा कर्तव्याची जाणिव ठेवून काम करावे लागणार आहे . कोरोनाच्या काळात शिक्षणात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने त्यांना पूर्व पदावर आणण्याच्या कामाला माझे प्राधान्य राहिल . - मोहन काळे , नूतन अध्यक्ष , शाळा व्यवस्थापन समिती - 
शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय रोपळे पंढरपूर.