*विठ्ठल अर्बनचे नवीन संचालक मंडळाची पहिली मासिक सभा संपन्न* *चेअरमन नागेशदादा फाटे यांच्या हस्ते नूतन संचालक मंडळाचा सन्मान*

पंढरपूर/ प्रतिनिधी
पंढरपूर येथे नव्याने स्थापन झालेल्या श्री विठ्ठल अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली मासिक सभा संस्थेचे संस्थापक नागेश एकनाथ फाटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत चेअरमनपदी नागेश एकनाथ फाटे यांची एकमताने निवड करण्यात आली .तर हनुमंत नरहरी काळे यांची व्हॉईस चेअरमन पदी निवड करण्यात आली.
याप्रसंगी संचालक पदावर अभिमन्यु विजयकुमार पवार, डॉ.रमेश एकनाथ फाटे,समाधान सुभाष फाटे,उमेश एकनाथ फाटे,सविता बाळासाहेब फाटे,विद्युलता बाळासाहेब बागल,तुकाराम पंढरीनाथ म्हस्के,औदुंबर भगवान माने,समाधान भारत कोळेकर यांची तर तज्ञ संचालक म्हणून विनय शिंदे यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी सर्व नुतन संचालकांचा सत्कार संस्थापक चेअरमन नागेश फाटे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी फाटे यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सहा.निबंधक कार्यालयाचे .विलास घोडके सहा.सहकारी अधिकारी उपस्थित होते.