*सोलापूर लोकसभेत शिंदे यांची पराभवाची हॅट्रिक होणारच*! *भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव नितीन काळे यांची गॅरेंटी*

पंढरपूर/प्रतिनीधी
सोलापूर लोकसभा मतदार संघातून मागील दोनवेळा पराभव होऊनही, यावेळी नव्या दमाने आ. प्रणिती शिंदे मैदानात उतरलेल्या दिसत आहेत. मात्र त्यांनी भाजपला बदनाम करून आपली पोळी भाजून घेण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांनी त्या भ्रमात न राहता , आपल्या पराभवाची हॅट्रिक पूर्ण करणार असल्याची गॅरंटी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव भाई नितीन काळे यांनी दिली आहे.
मागील दोन दिवसापूर्वी पंढरपूर भागात गावभेट दौरा सुरू असताना,आ. प्रणिती शिंदे यांनी अचानक मतासाठी फिरत असल्याचे पाहून चिडलेल्या मतदारांनी आतापासूनच त्यांना विरोध दर्शविण्यासाठी सुरुवात केली आहे. हे त्यांच्या पक्के डोक्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी मुद्दामहून आपली प्रतिक्रिया देताना जाणुनबुजुन भाजपला बदनाम करण्यासाठी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आपला प्रयत्न सफल तर होणारच नाही मात्र आपणास तिसऱ्यांदा पराभवास सामोरे जावे लागणार आहे. हे मात्र नक्की असल्याचेही नितीन यांनी सांगितले आहे.
आपण मागील दोन वेळा पराभव पत्करला आहे. त्यानंतर आपण पंढरपूर भागातील जनतेसाठी कधीही मदतीसाठी आलेला नव्हता. त्यानंतर आता परत मते मागण्यासाठी समोर दिसू लागला आहे. मोदी सरकारने गोरगरीब जनतेला अनेक योजनेच्या माध्यमातून आधार मिळाला आहे. यामुळेच भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी तर होणारच आहेत. मात्र त्यामधून आपली पराभवाची शंभर टक्के होणार असल्याची खात्रीही, भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव भाई नितीन काळे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाव भेटीदरम्यान त्यांना या कार्यकर्त्यांनी अडवले होते. ते कार्यकर्ते भाजपचे नव्हते. त्यामुळे अशी चिथावणीखोर केलेल्या वक्तव्याचा भाजप युवा मोर्चाचे वतीने निषेध करीत असल्याचे सांगितले.