*श्री.विठ्ठलमुर्ती संरक्षण स्मृती उत्सव परंपरा सुरू* *देगावचे सुर्याजीराव पाटील यांचे 13 वे वशंज चेअरमन अभिजीत पाटील यांच्या हस्ते पुजन*

पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील देगाव येथे मागील 15 वर्षापासून सुरू असलेला श्री.विठ्ठलमुर्ती संरक्षण स्मृती उत्सव कार्यक्रम मागील दोन वर्षे कोरोनामुळे बंद झाला होता. परंतु श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअमन आणि देगावचे ह.भ.प.सुर्याजीराव घाडगे पाटील यांचे 13 वे वंशज अभिजीत पाटील यांनी हा कार्यक्रम परत सुरू केला आहे.
हा कार्यक्रम मंगळवार दि.16 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये सकाळी 7.30 वाजता श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर येथील नामदेव पायरीजवळ पुजन करण्यात आले. पंढरपूर येथून सकाळी 10 वाजता दिंडीचे देगावकडे प्रस्थान झाले. सकाळी 11.30 वाजता देगाव येथे हरिभक्त परायन विठ्ठल महाराज पैठणकर यांचे भव्य किर्तन होवून दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
धर्मांध मुस्लीम राजा औरंगदेब यांने हिंदु धर्मातील सर्व देवस्थाने उध्दवस्त करण्याचा प्रयत्न चालविला होता. अफजलखानने राज्यावर स्वारी चालवत ही मोहिम आखली होती. यामुळे त्यावेळचे थोर विठ्ठल भक्त एकनिष्ठ उपासक प्रल्हाद बडवे यांनी विठ्ठल मुर्तीचे संरक्षण करण्यासाठी देगाव येथील ह.भ.प.सुर्याजी घाडगे पाटील यांना विनंती केली होती. त्यामुळे ती मुर्ती काही दिवस देगाव येथील शेतातील विहरीत लपवून ठेवली होती. तर काही दिवस घरातील तळघरात ठेवून नित्योपचार सुरू होते. यामध्ये इस 2 ऑक्टोबर 1695 ते 13 ऑक्टोबर 1699 या काळात या मुर्तीचे पाटील यांनी संरक्षण केले होते. यामुळे विठ्ठल भक्त प्रल्हादपंत बडवे यांचे वंशज देगावकर पाटलांना सहकार्य करीत आहेत. श्री.क्षेत्र पंढरपूर ते श्री.क्षेत्र देगाव दिंडी सोहळामध्ये ह.भ.प.विष्णू महाराज कबीर हे फडावरील टाळकरी मंडळीसोबत मोठ्या उत्सात साजरा करतात.
या श्रावण वद्य पंचमी या दिवशी हा कार्यक्रम साजरा करण्यात येत असतो. त्याप्रमाणे मोठ्या उत्सहात देगाव येथे कार्यक्रम पारपडला.
हभप.विठ्ठल महाराज पैठणकर, हभप भरत महाराज पैठणकर, हभप कुंरफूडे महाराज, कबीर महाराज, हभप आप्पा महाराज पिंपळनेरकर, अशीतोष बडवे, सिताराम साखर कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव कांळुगे, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रेमलताताई रोंगे, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.अमर साहेब पाटील, स्वेरी चे अध्यक्ष बी.पी.रोंगेसर, तसेच श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळासह,बाळासाहेब पाटील, शिवाजीराव पाटील, आनंद पाटील, यासह विठ्ठल भक्त, किर्तनकार, टाळकरी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर नामदेव पायरी येथून विहीर व तुळघरात पूजा करून भजन किर्तनाचा कार्यक्रम श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन सुविद्य पत्नी व अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.