*करकंब पोलीस स्टेशन मधील तिघांचा पदोन्नती निमित्त विशेष सत्कार* *शशिकांत कवीतकर, संजय मंगेडकर, संजय फुगारे यांची झाली पदोन्नत*

करकंब/प्रतिनिधी,
दि १५ ऑगस्ट आणि अमृतमोहोत्सव चे औचित्य साधत करकंब पोलीस स्टेशनमध्ये सध्या सेवेत असलेले स.पो.उप.निरीक्षक श्री.शशिकांत कवीतकर, श्री. संजय मंगेडकर, श्री संजय फुगारे यांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा करकंब पोलीस स्टेशनचे सहा. पो.निरीक्षक श्री.निलेश तारू साहेब यांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करीत सत्कार करण्यात आला.
या वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री.अजितकुमार मोरे साहेब यांच्यासह करकंब पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी वर्ग तसेच सा.बा.विभागाचे अधिकारी उपअभियंता श्री.डी.ए. पाटील साहेब भीमा पाटबंधारे विभागाचे श्री.साळुंखे साहेब महिला सुरक्षा समितीच्या सदस्या सुनीता देशपांडे मॅडम आदी उपस्थित होते. यावेळी वरील तिन्ही सत्कारमूर्तींचा उप.अभियंता श्री.डी. ए. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांनी वरील तिन्ही सत्कारमूर्तींना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या .