*करकंब ग्रामपंचायतने महिला कामगारांचा केला सन्मान.....*.! *स्वच्छ गाव सुंदर गाव करण्याचा महिला सफाई कामगारांचा मानस* *महिला सफाई कामगारांना केेले इरकल साड्यांचे वाटप*

करकंब/ प्रतिनिधी
करकंब ग्रामपंचायत ने स्वच्छता करणारे महिला सफाई कामगार यांचा गुणगौरव व या महिला सफाई कामगारांचा यथोचित सन्मान करकंब ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्या सौ कल्पना देशमुख, व सौ बाळूबाई खारे यांच्या हस्ते दीपावली निमित्त इरकल साड्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य एडवोकेट शरदचंद्र पांढरे प्राध्यापक सतीश देशमुख सर सावता खारे पत्रकार मनोज पवार विशाल देशमुख नितीन माळवदकर तेजस वाघमारे अतिश शिंदे संभाजी खंदारे आदी उपस्थित होते. या सन्मान सोहळ्याप्रसंगी महिला कर्मचाऱ्यांनी बोलताना यावर्षीच्या दीपावलीनिमित्त महिला सफाई कामगारांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करून सन्मान केल्याने याबद्दल धन्यवाद व्यक्त करून यापुढे स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून काम करणार असल्याच्या मानस सर्व महिला सफाई कामगार यांनी या वेळी व्यक्त केला.