*करकंब येथे संत पालखीचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत....!* *संत निळोबाराय पालखीचे करकंब मध्येआगमन.

*करकंब येथे संत पालखीचे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत....!*  *संत निळोबाराय पालखीचे करकंब मध्येआगमन.

करकंब /प्रतिनिधी :

-साधु ..संत येती घरा... तोची दिवाळी दसरा.... याप्रमाणे करकंब पावन पुण्यनगरी त आज पासून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी ती पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने निघालेल्या संत निळोबा राय पालखीचे  करकंब हद्दीत सकाळी नऊ वाजता आगमन होताच करकंब पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक- निलेश तारू यांनी भक्तीवर भक्तीमय वातावरणात प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक -निलेश तारू, पो.ना. बालाजी घोळवे,पो.ना.आर आर जाधव, पो.ना.दया हजारे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते
    संत निळोबाराय पालखी सोहळा करकंब येथील निवृत्तीनाथ मंदिर मोडनिंब रोड, येथे मुक्कामी असल्याने सध्या या पंचक्रोशीत सध्या या पंचक्रोशीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासन आरोग्य विभाग सतर्क असून मात्र पदाधिकारी आणि प्रशासन या पालखीच्या आगमना वेळी गायब असल्याचे चित्र दिसून आले.