*मोहोळचे आ. यशवंत माने यांच्या पाठपुराव्यास यश* *मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र क्रीडा संकुलास मंजुरी* *क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या दालनात पार पडली बैठक*

पंढरपूर/प्रतिनीधी
मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार यशवंत माने यांनी या मतदार संघात जास्तीत जास्त निधी खेचून आणला आहे. अशातच बुधवारी क्रीडा मंत्री ना. संजय बनसोडे यांच्या समवेत या भागातील पदाधिकारी यांची विशेष बैठक झाली.यामध्ये मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी स्वतंत्र क्रीडा संकुल मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ. यशवंत माने यांनी दिली आहे.
या मंजुरी मिळालेल्या मोहोळ तालुका क्रीडा संकुलास मोहोळ येथे ,तर उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संकुलास वडाळा येथे मंजुरी मिळाली आहे
माजी आमदार राजन पाटील व ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यामुळे बुधवारी मुंबई मंत्रालय येथे क्रीडामंत्री ना .संजय बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली व आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकाऱ्या समवेत झालेल्या बैठकीत मोहोळ तालुका क्रीडा संकुलास मोहोळ येथे तर उत्तर सोलापूर तालुका क्रीडा संकुलास वडाळा येथे मंजुरी मिळाली आहे.
या बैठकीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा वडाळा गावचे सरपंच मा जितेंद्र साठे,समाधान कारंडे,हरिभाऊ घाडगे, भाऊसाहेब लामकाने उपस्थित होते.