*एकीकडे विठ्ठल कारखान्याची निवडणूक.... तर दुसरीकडे जिल्हा परिषद.. पंचायत समिती चा  रणसंग्राम.....!* *सामान्य कार्यकर्ता.. व मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीला काय भूमिका घेणार....?*

*एकीकडे विठ्ठल कारखान्याची निवडणूक.... तर दुसरीकडे जिल्हा परिषद.. पंचायत समिती चा  रणसंग्राम.....!*  *सामान्य कार्यकर्ता.. व मतदार जिल्हा परिषद व पंचायत समितीला काय भूमिका घेणार....?*

करकंब/ प्रतिनिधी:

-सध्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळी जोरात सुरू असून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तर दुसरीकडे आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणसंग्रामा मुळे पंढरपूर-माढा तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळी बरोबरच निष्ठावंत.. कट्टर समर्थक... अगदी घरोब्याचे संबंध असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवा संचार ...उत्साह या पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातून दिसून येत आहे. या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक निकालावर निश्चित परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळातून व्यक्त केले आहे. 
पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गण स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायत या माध्यमातून सर्वसामान्य बरोबरच समाजातील सर्वच घटकांचा शैक्षणिक, सामाजिक, व विविध विकासाची कोणतीही ठोस भूमिका घेतली असे ग्रामीण भागातून बोलले जात आहे.

 

  या माध्यमातून होणाऱ्या विविध बाबींचा कितपत स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायत च्या माध्यमातून प्रत्येक गावात... खेड्यात ...काय अवस्था आहे. स्वतः सामान्य मतदार व सामान्य कार्यकर्त्याने विशेषता सुज्ञ नागरिकांनी अनुभवले असल्याची चर्चा या तालुक्यातून ऐकावयास मिळत आहे. मग एवढा मोठा दर वर्षी येणारा निधी. मग त्याच निधीवर दरवर्षी होणारा खर्च... पुन्हा
ठेकेदारी ... ठेकेदारी तून सत्ता.,. सत्तेतून राजकारण... आणि पुन्हा जनतेसमोर निवडणुकीला सामोरे येणार... परत त्याच रस्त्याचे पुन्हा ठेकेदारी... पुन्हा तोच निधी... हे असे चालल्यामुळे माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांनी टक्केवारीची  पोल-खोल मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेत काही दिवसांमध्ये केली होती. अशामुळे जनतेच्या कोट्यवधी रुपयाचे विलेवाट आणि नुकसान लूट खुलेआमपणे सुरु असल्याची सर्वसामान्यत चर्चा असल्यामुळे आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही पंढरपूर तालुक्यातील अत्यंत चुरशीची व अटीतटीची होणार असून या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये अनेक जणांचे राजकीय वर्चस्व पणाला लागणार आहे हे मात्र निश्चित.