*करकंब जिल्हा परिषद गटात सहा गावांचा समावेश.* *करकंब, उंबरे स्वतंत्र पंचायत समिती गण* *जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार.....!*

करकंब /प्रतिनिधी:
-अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार असून या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने करकंब जिल्हा परिषद गटात यापूर्वी 12 गावांचा समावेश होता. यावेळी या करकंब जिल्हा परिषद गटामध्ये करकंब सह जळवली, सांगवी, बादलकोट, उंबरे, कान्हापुरी आणि करोळे या गावांचा समावेश झाल्याने या जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीची रंगतआणखीनच वाढली असून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यासाठी या करकंब जिल्हा परिषद या गटाची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व महत्त्वपूर्ण मानली जात असल्याची चर्चा केली जात आहे.
करकंब जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असल्याने या बालेकिल्ल्याचा गड भारतीय जनता पार्टी राखणार.... की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या गनिमी काव्याने मुसंडी मारून भारतीय जनता पार्टीचा हा गड काबीज करणार का...? याची उत्सुकता लागून राहिली आहे.