*शिष्यांच्या मृदुंगनादाने पं गोविंद भिलारे यांना श्रध्दांजली* *समीर दुबळे.नागेश आडगांवकर. सुनिल अवचट यांनीही आपल्या सुरांनी वाहिली श्रध्दांजली*

करकब / प्रतिनिधी
पं गोविंद भिलारे आंतरराष्ट्रीय किर्तीचे पखवाज वादक कोरोनानं दु:खद निधन झाले. यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त त्याच्या मुळगावी किकवी (भोर) येथे मृदुंगाचार्य शंकर वसंत फांऊंडेशन व शिष्य मंडळीच्या वतीने संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचपूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.सुरुवातीला गोविंद भिलारे यांच्या शिष्य आकाश तुपे.ज्ञानेश कोकाटे सिध्देश उंडाळकर. ज्ञानेश्वर दुधाणे.मनिष तांबोसकर. गणेश चौधरी.स्वप्नील सुर्यवंशी.ज्ञानेश्वर हिरगुडे.भुषण भागवत.यांच पखावजवादन मृदुंगनाद झाले.त्यामध्ये पं वसंतराव घोरपडकर.यांच्या रचना वाजवून नादमय वातावरण झाले.आणि पं गोविंद भिलारे यांनी आपल्या शिष्यांकडून करुन घेतलेली मेहनत दिसून आली. त्यानंतर ख्यातनाम गायक नागेश आडगांवकर यांच्या गायनाला सुरुवात झाली.त्यामधे त्यांनी विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म.अन गोविंद दादांचा आवडता अभंग धिरे धिरे रे मना गाऊन श्रध्दांजली अर्पण केली. या भावपूर्ण अभंगानं भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.त्यांना सुंदर तबलासाथ किशोर कोरडे हार्मोनियम साथ देवेंद्र देशपांडे.पखावज सिध्देश उंडाळकर यांनी केली. त्यानंतर हरिप्रसाद चौरासीया यांचे शिष्य सुनील अवचट यांचे बासरीवादन झाले.राग अभोगी वाजवून गोविंद भिलारे यांना श्रध्दांजली वाहिली.त्यांना उत्तम तबलासाथ किशोर कोरडे यांनी केली.शेवटी पद्मश्री जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य समीर दुबळे यांच सुंदर गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांमध्ये त्यांनी राग अमृत वार्षिनी विलंबित झपतालातील व मारुबिहाग मधिल बंदिश गायली नंतर आधी रचली पंढरी हा अभंग गाऊन शिव के मन शरण हो या सुंदर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना तितकीच सुंदर तबलासाथ चारुदत्त फडके.हार्मोनियम देवेंद्र देशपांडे. पखावज ज्ञानेश्वर दुधाणे. यांनी केली.कोरोनाचे सर्व नियम पाळुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व शिष्य मंडळींनी पं गोविंद भिलारे यांनी निर्माण केलेल्या पखावजविश्वाच प्रचार अन प्रसार केलेल काम शिष्यांच्या वतीन असच एकजूटीनं पुढं नेण्याच करणार असल्याचे अभिवचन आकाश तुपे यांनी दिले.या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.गणेश भगत यांनी केले. यावेळी गोविंद भिलारे यांचे भाऊ नारायण भिलारे.भगवान भिलारे पत्नी मनिषा भिलारे. श्रेया भिलारे. शिवतेज भिलारे. व कुटुंबीय व किकवीकर रसिक ग्रामस्थ उपस्थित होते.