*चौघांही वारसदारांना राजकीय पर्याय उरला नसल्यानेच एकत्र* *अभिजीत पाटील यांचा घणाघात*

*चौघांही वारसदारांना राजकीय पर्याय उरला नसल्यानेच एकत्र*  *अभिजीत पाटील यांचा घणाघात*

पंढरपूर/प्रतिनीधी

विठ्ठलची दुरवस्था पाहून विठ्ठल चे सभासद यांनी भगीरथ भालके यांनी दूर लोटले. सहकार शिरोमणीची निवडणूक लागताच कल्याणराव काळे यांच्या मदतीला भालके आणि दोन पाटील एकत्र आले. या निवडणुकीनंतर आपली राजकीय कारकीर्द थांबणार या भीतीनेच हे सर्वजण एकत्र आले आहेत. परंतु या निवडणुकीत या चौघांनाही आडवे केल्याशिवाय सभासद स्वस्थ बसणार नाहीत .असे मत विठ्ठल चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. ते खर्डी येथील प्रचार सभेत बोलत होते.या प्रसंगी एड दिपक पवार, डॉ बी. पी. रोंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
       सहकार शिरोमणी साखर साखर कारखान्याची निवडणूक अंतिम टप्यात आली असताना, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडू लागल्या आहेत. खर्डी येथील प्रचार सभेत अभिजीत पाटील यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. विठ्ठल कारखाना निवडणुकीत भगीरथ भालके यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केलेले.युवराज पाटील ,गणेश पाटील यांच्या अट्टाहासमुळे ही निवडणूक लागली होती.या निवडणुकीत भालके आणि पाटील यांच्यात मोठे हाडवैर होते. यावेळी आपण तिसरा पर्याय म्हणून या निवडणुकीत उभा होतो. सभासदांनी प्रथम क्रमांकाची मते देऊन आपणास विजयी केले.तेव्हापासून विठ्ठलचा कारभार सुरळीत सुरू आहे.याच काळात. सहकार शिरोमणी ची निवडणूक लागली. अपणावरील सभासद यांचा विश्वास वाढत असल्याचे दिसून आल्याने दोन्ही पाटलानाही कसेसे होऊ लागले.यामुळेच  विठ्ठलचे निवडणुकीतील हाडंवैरी कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. सहकार शिरोमणी चे कारभारावर न बोलता बाष्कळ  बडबडू बोलू लागले. 
पंढरपूर तालुक्यातील या राजकारणावर बोलताना अभिजीत पाटील यांनी जोरदार प्रहार केला. आपणाला उटी लावण्याचे काम करणाऱ्या चौघांनाही एकाच वेळी आडवे करण्याचा मनोदय बोलून दाखविला. विठ्ठल च्या सभासदांनी जसा आपणावर विश्वास दाखवीत भालके यांनी दूर लोटले. त्याचप्रमाणे या निवडणुकीतही सभासद या चौघांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे यांनी इतर गोष्टीची चर्चा न करता कारखान्यावर बोलावे. येत्या १४तारखेपर्यंत बिल देण्याची व्यवस्था  करावी.नाहीतर सभासद तुमच्यावर भरोसा नाय म्हणत, भगीरथ भालके प्रमाणेच तुमचीही उचलबांगडी केल्याशिवाय राहणार नाहीत.असेही अभिजीत पाटील यांनी विरोधकांना ठणकावले .
      यावेळी ऍड दिपक पवार, डॉ बी.पी. रोंगेसर यांच्यासह अनेकांनी कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले.


चौकट

काळे यांचा रोग घालविण्यासाठी परिवर्तन करा : रोंगेसर

सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांना  कुणाचेही देणे न देता, केवळ कारखान्यातील पैसे हडप करत, कारखाना अडचणीत आणला आहे. हा त्यांना लागलेला रोग आहे. या निवडणुकीतून बरा करायचा असेल तर सत्तांतर घडवा .असे आवाहन डॉ बी.पी. रोंगे सर यांनी केले आहे.