पंढरपुर शहरातील वाळू उपशावर कारवाई दोन होड्या जमीनदोस्त, वाळू साठा केला नष्ट!

पंढरपुर शहरातील वाळू उपशावर कारवाई दोन होड्या जमीनदोस्त, वाळू साठा केला नष्ट!

पंढरपुर /प्रतिनिधी

पंढरपुर शहरातील दिवसा ढवळ्या होणाऱ्या वाळू चोरीवर येथील महसूल आणि पोलीस पथकाने कारवाई केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी सुमारास घडली आहे. वाळू चोरीत वापरण्यात आलेल्या दोन होड्या जमीनदोस्त करून वाळू साठाही नसत करण्यात आला आहे.
      तीर्थक्षेत्र पंढरपूर शहरात गजबजलेल्या ठिकाणी नदीपात्रातून दिवसरात्र वाळू उपसा होत असल्याची चर्चा कायमच होत होती, या वाळू चोरीमुळें येथील महसूल आणि पोलीस प्रशासनावर टीकाही केली जात होती. सोमवारी 7जून रोजी सायंकाळी4च्या सुमारास अचानक कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे पथक येथील नवीन पुलाखालून सुरू असलेल्या वाळू उपसा जवळ पोहचले, यावेळी या पथकास वाळू चोरीत वापरल्या जाणाऱ्या2लाकडी जोड्या तसेच2ब्रास वाळू आढळून आली. वाळू तस्कर याठिकानाहून गायब झाले.
      महसूल विभागातील तसेच पोलीस प्रशासनातील या पथकाने याठिकाणी आढळून आलेल्या होड्या जेसीबी च्या जमीनदोस्त केल्या. नदीपात्रातून बाहेर बाहेर काढलेली वाळू ही नदीपात्रात ढकलून देण्यात आली.
    पंढरपूर शहराच्या लागत वाळू तस्करवर करण्यात आलेली ही कारवाई तहसीलदार बेल्हेकर तसेच  शहर पोलीस ठाण्याचे पो. नि. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पंढरपूर चे मंडल अधिकारी समीर मुजावर,तलाठी राजेंद्र वाघमारे, दीपक राऊत, प्रशांत शिंदे, पो ना ताजजुद्दीन मुजावर,पो.पी आर हजारे, होमगार्ड शकर कांबळे आदींचा समावेश आहे.