*जिद्द चिकाटी आणि प्रयत्नशीलता हीच यशाची  साधना आहे -कल्याण काळे*  *वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेत्या खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

*जिद्द चिकाटी आणि प्रयत्नशीलता हीच यशाची  साधना आहे -कल्याण काळे*  *वसंतराव काळे प्रशालेत राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेत्या खेळाडू व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न*

प्रतिनिधी/. पंढरपूर...

जिद्द चिकाटी व सातत्यपूर्ण प्रयत्नशीलता हीच यशाची साधना आहे असे प्रतिपादन श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी केले ते राष्ट्रीय पातळीवर खेलो  इंडिया खो खो  स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या खेळाडूंचा व इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते* . 
यावेळी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशपातळीवर झालेल्या खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना प्रशालेची अष्टपैलू खेळाडू प्रीती काळे हिने महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून देण्यात बहुमूल्य कामगिरी बद्दल  विशेष सन्मान  करण्यात आला तसेच इयत्ता दहावी मधील  गुणवंत विद्यार्थी प्रथम श्वेता यलमार द्वितीय अश्विनी चव्हाण तृतीय स्वप्नजा काळे इयत्ता बारावी विज्ञान शाखा प्रथम रोहिणी काळे द्वितीय किशोरी माने तृतीय प्रगती भूई कला शाखा प्रथम स्नेहा पासले द्वितीय फिजा मुजावर तृतीय अश्विनी सुरवसे या गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला .
 
 यावेळी पुढे बोलताना काळे म्हणाले की प्रत्येक मुलांच्या अंगी असलेल्या गुणांना वाव देण्याची जबाबदारी शाळांची असून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे नैपुण्य ओळखून त्यांना आकार देणे गरजेचे आहे.
 *यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विक्रम कदम बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी न्यूनगंडाची भावना सोडून देऊन भविष्याचा वेध घेण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण गोष्टी शिकत राहणे गरजेचे आहे. शिक्षणाचा पाया भक्कम असेल तर भविष्यकालीन गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांच्या इमारती उभा राहतील असे सांगत पदापेक्षा चांगला माणूस म्हणून मोठं होणं गरजेचे असल्याचे सांगितले.*
 यावेळी  कार्यक्रमास संस्थेचे संचालक चंद्रकांत पाटील महादेव नाईकनवरे संस्थेचे सचिव बाळासाहेब काळे प्राचार्य दादासो खरात, संतोष गुळवे मुख्याध्यापक अनिल कौलगे नंदकुमार दुपडे पर्यवेक्षक सत्यवान काळे रायझिंग स्टार पब्लिक स्कूलच्या प्राचार्य गीतांजली खाडे, योगेश काळे आप्पासो पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  बाळासाहेब काळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काळे यांनी केले  व उपस्थितांचे आभार  सहशिक्षकदिलीप लिंगे यांनी मानले.