*करकंब येथील समर्थ जनरल स्टोअर्स आणि गिफ्ट हाऊसचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते उद्घाटन.*..! *आगामी जिल्हा परिषद च्या निमित्ताने प्रणव परिचारक यांच्या भेटीने चर्चेला उधाण* *धोका टाळण्यासाठी परिचारक गटासाठी युवानेते प्रणव परिचारक हाच एकमेव मार्ग *
करकंब /प्रतिनिधी:
येथील नेमतवाडी रोड वरील कनकंबा चौक येथे श्री स्वामी समर्थ जनरल स्टोर चे आणि गिफ्ट हाऊसचे उद्घाटन आगामी जिल्हा परिषदेचे करकंब जि प गटाचे भावी उमेदवार व युवा नेते प्रणव परिचारक हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी माजी विरोधी पक्ष नेते राहुल काका पूरवत माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब आंबुरे, प्राध्यापक सतीश देशमुख सर युवा नेते अभिषेक पुरवत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग तात्या नगरकर युवा नेते सौरभ देशमुख हनुमंत खारे प्रीतम नकाते अक्षय नकाते ओंकार कुंभार नितीन गुळमे प्रकाश नागरस रामा शिंदे शिवा शेटे सह बहुसंख्य पदाधिकारी ग्रामस्थ

उपस्थित होते.
सध्या आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने धोका टाळण्यासाठी करकब जिल्हा परिषद गटातून युवा नेते प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्यात यावी अशी चर्चा करकंब जिल्हा परिषद गटात सुरू असल्याने युवा नेते प्रणव परिचारक सध्या सातत्याने करकंब जिल्हा परिषद गटाशी संपर्क साधून आहेत. त्यामुळे ते सतत नेहमी भेटीच्या निमित्ताने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या चर्चेला उधाण येत असून युवा नेते प्रणव परिचारक यांना या करकंब जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिल्यास निश्चित पणाने ही निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा होत आहे.