*उडीद पिकाचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना भरपाई द्या!* **रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार व्यवहारे यांची मागणी*

करकंब/ प्रतिनिधी
करकंब व परिसरात गतवर्षीपेक्षा यावर्षी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी उडीद पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. गेल्यावर्षी उडीद पिकाला दर व उताराही एकरी शेतकऱ्यांना चांगला मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यानी पेरणी करून ऐन काढणीच्या वेळी पावसाने थैमान घातल्यामुळे करकंब आणि या परिसरातील शेतकऱ्यांचे उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी रयत क्रांती संघटना चे जिल्हा युवक अध्यक्ष नंदकुमार व्यवहारे यांनी केली आहे.
करकंब येथील मुळता पूर्व भाग हा पूर्वीपासूनच दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील बरेच शेतकरी खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात उडीद पिकाची पेरणी करतात. मात्र या वर्षीच्या ऐन काढणीच्या वेळी पाऊस सतत चालू असल्यामुळे सदरची उडीद पीक शेतातच पुन्हा होऊन आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे बियाण्याचे पेरणीचे व मेहनत ही वाया गेल्याने शासनाने याबाबत त्वरित पंचनामा करण्याची मागणीही शेतकऱ्यांमधून होत असल्याचे यावेळी नंदकुमार व्यवहारे यांनी सांगितले.