*पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेच्या अध्यक्षपदी गोपाळ घाडगे*

*पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेच्या अध्यक्षपदी गोपाळ घाडगे*

पंढरपूर:-प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे आदेशानुसार पंढरपूर तालुक्यातील कृषी सहाय्यक संघटनेचीही नुकतीच बैठक पार पडली, यावेळी नूतन तालुकाध्यक्ष पदी गोपाळ कृष्णा घाडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.
    यातील कृषी कार्यालयाच्या सभागृहात तालुक्यातील कृषी सहाय्यक कर्मचारी यांची बैठक पार पडली, यावेळी इतरही कार्यकारणी आणि विविध पदे जाहीर करण्यात आली,
  यामध्ये सचिवपदी धनराज खोत, कार्यध्यक्षपदी किरण चव्हाण, तर उपाध्यक्षपदी विशाल नागतीलक, महेश बाबर,आनंद चव्हाण, राहुल मोरे. यांची निवड जाहीर करण्यात आली.
  सहसचिव म्हणून शामराव माळी, प्रसिद्धी प्रमुख म्हणूननागेश बनसोडे, तर संघटकपदी धनाजी लवटे, आणि स्वाती गवळी यांची निवड करण्यात आली.यावेळी जिल्हा प्रतिनिधी अमोल भोरकडेआणि आनंद ढवळे उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन करून सत्कारही करण्यात आला.