*करकंब येथे विविध ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.*

करकंब/प्रतिनिधी
करकंब ता पंढरपूर येथे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.मध्यवर्ती मंडळ बस स्थानक,करकंब ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व इतर सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा,माध्यमिक हायस्कूल, रोहिदास नगर, बुधवार पेठ आदी ठिकाणी आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
मध्यवर्ती उत्सव मंडळ बस स्थानक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करकंबच्या सरपंच तेजमाला पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक महेश मुंढे,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच आदिनाथ देशमुख,मा.जि प सदस्य बाळासाहेब देशमुख, रासपचे तालुका अध्यक्ष ऍड शरदचंद्र पांढरे, ग्रामपंचायत सदस्य- राहुल पुरवत, बाबुराव जाधव,बापू शिंदे,सतीश देशमुख, सुनीता देशपांडे, वंदना पंत,सुरय्या आतार, रेखा गायकवाड, सचिन शिंदे,सुनील मोहिते,संजय धोत्रे,सुनील धोत्रे,महेंद्र पवार,महिंद्र शिंदे,आदिनाथ देवकते, मारुती देशमुख, मनोज पवार व ग्रामविकास अधिकारी, सर्व आजी-माजी ग्रा.सदस्य आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्ष महेंद्र शिंदे,विश्वजित शिंदे,राजेश खरे, नारायण गायकवाड,अमित खंकाळ,नेताजी शिंदे,प्रदीप खंकाळ,दीपक शिंदे,भागवत लोंढे,प्रकाश मोरे,शंकर सरवदे,संजय शिंदे,शिवाजी शिंदे,जितेंद्र शिंदे,आप्पा शिंदे,विकास शिंदे,राजेश शिंदे,वंशदिप शिंदे,बाबासो लोंढे,सुरेश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
युवाशक्ती समूहाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत चार दिवस विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. वक्तृत्व स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना साहित्यांचे वाटप, हिंदू मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी, जनावरांसाठी स्मशानभूमीत पाणपोई, सफाई कामगार महिलांना साड्या, घंटागाडी ड्रायव्हरला कपडे असे विविध उपक्रम घेण्यात आले.