*करकंब लेकीचं झाड अभियान पूर्ण महाराष्ट्र भर राबविले पाहिजे:-मुख्यकार्यकारी अधिकारी गोविंद जाधव*

*करकंब लेकीचं झाड अभियान पूर्ण महाराष्ट्र भर राबविले पाहिजे:-मुख्यकार्यकारी अधिकारी गोविंद जाधव*

करकम्ब/प्रतिनिधी
आज करकंब येथे करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान करकंब मध्ये झाडांना ड्रीप करण्याच काम चालू असतानाच कर्जत येथील  माझी वसुंधरा ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण प्रेमींची सायकल वारी टीम करकंब मार्गाने जात असताना कर्जत गावचे नगरपालिका मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. गोविंद जाधव यांचा निरोप रमेश ढोबळे यांना आला की करकंब मध्ये आम्हांला दोन झाड ट्रीगार्ड सहीत लावायची आहेत.त्याच वेळी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाणे यांच्याशी संपर्क करून वृक्षारोपण करण्यासाठी त्यांची ५०युवकांची टीम MSCB करकंब येथे उपस्थित राहिली तिथं सर्वांच्या शुभहस्ते दोन झाडांच वृक्षारोपण केले'आणि त्यांनी राबवत असलेल्या अभियानाची माहिती देताना गोविंद जाधव म्हणाले की हे अभियान आम्ही २आँक्टोंबर २०२०साला पासून अविरत दररोज सकाळी ६:३०ते  ७:३० यावेळात राबवले पूर्ण कर्जत गाव कचरामुक्त केले,आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की एक पोत कचरा दाखवा एक लाख रु मिळवा इतक स्वच्छ सुंदर कर्जत शहर निर्माण झाले आहे.यानंतर लोकसहभागातून वृक्षारोपणही कर्जत शहरात सर्वत्र राबवण्यात आले.त्यालाही सर्वांचा प्रतिसाद मिळाला.प्रत्येक शंभर दिवसांनी एक इव्हेंट घेऊन समाजपयोगी उपक्रम आम्ही सर्वजण राबवत आहोत आणि आज करकंब येथे करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान अतिशय आवडला हेही अभियान कर्जत येथे आम्ही राबवू असे सांगीतले.आम्ही झाडाच्या रुपान लावलेल्या दोन लेकीचं संगोपन करण्याच अवाहन या टीमच्या वतीने करण्यात आले. यावेळी लेकीचं झाड अभियानाचे संकल्पक  ज्ञानेश्वर दुधाणे यांनी अभियानाविषयी  माहीती सांगितली.लेकींच्या सहभागातून ड्रीप चही काम पूर्ण झालेल आहे.यावेळी पांडुरंग काटवटे, नंदलाल कपडेकर, प्रमोद रेडे.हरिश्चंद्र वास्ते,विजय जाधव,गणेश पिसे.अक्षय नगरकर,आत्माराम चवरे,विजय दुधाणे, रमेश ढोबळे,अक्रूर शिंदे,चेतन पुरवत आदी उपस्थित होते.