*करकंब येथे महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे उद्या -बुधवारी रस्ता रोको आंदोलन.* *प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन*. *करकंब येथील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा...!!

करकंब /प्रतिनिधी :
करकंब येथील नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी. तसेच गुन्हा नोंद होऊन दोन महिने झाले तरी कंपनीच्या मालकांना व ओंकार कृषी केंद्र चालक मालक यांना अटक करावी. आणि संबंधित कृषी अधिकारी यांनी वेळोवेळी दुकानाची तपासणी न केल्याने बनावट औषधे विकण्यात आली. अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. मॉर्डन ऍग्रो जेनेस्टिक कंपनी व ओंकार कृषी केंद्र करकंब .संबंधित कृषी अधिकारी यांनी मिळून नुकसानग्रस्त द्राक्ष शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी .यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष - प्रभाकर भैया देशमुख .यांच्या नेतृत्वाखाली उद्या बुधवार दिनांक-18/1/2022 रोजी दुपारी- एक वाजता अभिमान नगर, जळवली चौक करकंब. येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांनी सांगितले.
नुकताच या करकंब येथील ओंकार कृषी केंद्र केंद्राचे सील तोडल्याने करकंब पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामुळे करकंब व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.असे असतानाच या नुकसानग्रस्त द्राक्ष शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला असून या दृष्टीने शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि कृषी दुकानाची न झालेली तपासणी यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान या दृष्टीने कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन यासाठी हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने राज्य जनहित शेतकरी संघटना व शेतकरी आक्रमक भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.