*करकंब येथील ओंकार कृषी केंद्र चालकासह मुलावर चोरीचा गुन्हा दाखल*

करकंब/प्रतिनिधी
करकंब येथील औंकार कृषी केंद्र यांचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आलेला असताना व सदर कृषी केंद्र तालुका कृषी अधिकारी यांनी सीलबंद केले असताना विनापरवाना बेकायदेशीर सील तोडून त्यामधील माल चोरून नेला असल्याने दुकान मालक संजय राजाराम पवार व मुलगा औंकार संजय पवार दोघे रा. शुक्रवार पेठ करकंब यांच्या विरोधात करकंब पोलिस 48 तासानंतर चोरीचा गुन्हा पंढरपूर तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की,
दि. 01/11/2022 रोजी तालुका कृषी कार्यालय पंढरपूर येथे करकंब व बार्डी गावातील 08 शेतकरी यांचेकडून ओंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब येथून ग्लायस्टॉप तणनाशकाची ऑक्टोबर छाटणी पुर्वी द्राक्ष बागेत फवारणी केली होती. त्यामुळे आमची द्राक्ष बाग फूटली नाही व आमचे द्राक्ष बागेचे मोठे नूकसान झाले आहे, तरी आपले कार्यालयाकडून संबंधीत कंपनी व दुकानदार यांचेवर कारवाई करणेसाठी तक्रारी अर्ज दिल्याने तालुका कृषी अधिकारी यांनी कार्यालयातील तालूका तक्रार निवारण पथकासह किटकनाशक अधिनीयम 1968,1971 व किटकनाशक नियंत्रण आदेश 1986 अन्वय दिनांक 05/11/2022 रोजी औंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब व सदर तक्रारीच्या संदर्भाने दुकानाची व गोडाऊनची तपासणी करून सदर ग्लायस्टॉप तणनाशकाचे प्रयोगशाळेत पाठवणेसाठी नमूना काढून घेतला व दुकानातील व गोडाउनमधील सर्व मालाचा पंचनामा सदर मालकाचा मुलगा औंकार संजय पवार यांचे समक्ष करून सदर दुकानाचे शटरचे कुलूपांना व गोडाऊनचे कुलूपांना सीलबंद केले होते व त्याच्या कुलूपाच्या च्याव्या सुरक्षेच्या दृष्टीने मालकचा मुलगा औंकार संजय पवार यांचे ताब्यात दिले होत्या. तसेच त्यांना पुढील कायदेशीर बाबी पार पडलेनेतरच लेखी परवानगीने आस्थापना उघडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर ओंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब चे मालक संजय राजाराम पवार रा. शुक्रवार पेठ करकंब यांना दिनाक 09/11/2022 रोजी सकाळी 11/00 वाजता जिल्हा अधिक्षक कार्यालय कृषी अधिकारी सोलापूर यांचे कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहणेबाबत नोटीस देऊन सदरची सुनावणी दिनांक 09/11/2022 रोजी होवून मा. जिल्हा अधिक्षक कार्यालय कृषी अधिकारी यांनी औंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब यांचे दुकानाचा परवाना पूढील आदेश होईपर्यंत निलंबीत केलेचे आदेश दिल्याने दुकानातील सर्व मालाची विक्री बंद करणेचा आदेश दिला होता. तालुका कृषी अधिकारी सरडे व गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक धनंजय पाटील यांनी दि.05/11/2022 रोजी औंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब यांचेकडे विक्री परवाना नसलेले कंपनीचे तननाशक मिळून आलेने गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक धनंजय पाटील यांनी दि. 18/11/2022 रोजी करकंब पोलीस ठाणेत गु.र.नं.398/2022 भादवि कलम 420, 34 सह किटकनाशक अधिनीयम 13,29 वगैरे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर दिनांक 14/01/2023 रोजी अमर सदाशीव व्यवहारे, बबन प्रभाकर दुधाळ व रियाज बाळू कोरबू सर्व रा. करकंब यांनी मोबाईल तालुका कृषी अधिकारी सरडे यांना फोन करून कळविले की, ओंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब येथील दुकानाचे व गोडाऊनचे कुलूपाचे सील तोडून सदर दुकानातील व गोडावून मधिल कृषी निवीष्ठा माल मालकाने चोरून नेला आहे असे कळविल्याने सरडे व सहकारी शासकीय अधिकारी महेश नामदेव देवकते,व सागर शिवीजी भोसले असे औंकार कृषी केंद्र शुक्रवार पेठ करकंब येथे येवून सदर दुकानाची व गोडाऊनची पाहणी केली असता सदर दुकानाचे व गोडाऊनचे कूलूपाचे सील पंच व साक्षीदार यांचे समक्ष पुन्हा पाहणी केली असता सदर कुलूपाचे सील तूटलेले दिसून आले. त्यानंतर सदर दुकानातील कृषी निविष्ठा मालाची पाहणी करून पून्हा फेर पंचनामा केला असता काही माल गायब असल्याचे दिसून आले सदर दूकानातील व गोडवाणातील एकूण 19 कंपनीचे औषधे (एकूण- 331473.00 किं.अं. रूपये)चोरीस गेली असल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी सरडे यांनी करकंब पोलिसात दिली असून दुकानाचे मालक संजय राजाराम पवार व मुलगा ओंकार संजय पवार रा.शुक्रवार पेठ करकंब यांच्या विरोधात भादवी सह कलम 188,454,457,380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.